बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:37 PM2022-03-19T12:37:57+5:302022-03-19T12:44:16+5:30

The Kashmir Files चित्रपटाने 8 व्या दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

The kashmir files box office collection day 6 beats dangal anupam kher | बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे

बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे

googlenewsNext

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदोड  सुरूच आहे. या चित्रपटाने 8 व्या दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. इतकेच नाही तर 'द काश्मीर फाइल्स'ने 8 व्या दिवशी कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाचा रेकॉर्डही मोडला आहे.

द कश्मीर फाइल्सची जबरदस्त कमाई 
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून लिहिले, काश्मीर फाइल्सने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 8व्या दिवशी 19.15 कोटींची कमाई केली. हे कलेक्शन बाहुबली 2 (19.75 कोटी) च्या जवळ आहे आणि दंगल (18.59 कोटी) पेक्षा जास्त आहे. हे दोन्ही चित्रपट आयकॉनिक हिट आहेत. द कश्मीर फाइल्स ब्लॉकबस्टर सिनेमाच्या यादीत सामील झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 19.15 कोटींची कमाई केली. भारतीय आता या चित्रपटाचे एकूण 116.45 कोटींचा गल्ला जमावला आहे.  

दुसऱ्या वीकेंडला हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा पार करेल. काश्मीर फाइल्सने 8व्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग वेगाने झाले आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतही डब केला जाणार आहे. याचा अर्थ द काश्‍मीर फाईल्सचा येत्या आठवड्यात आणखी बिझनेस करेल याची खात्री आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.


द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल  आणि विवेक रंजन अग्निहोत्री  यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या  चित्रपटात  महत्वाची भूमिका साकारली आहे. 

Web Title: The kashmir files box office collection day 6 beats dangal anupam kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.