The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, या राज्यांमध्ये कली सर्वाधिक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:13 PM2022-03-18T15:13:40+5:302022-03-18T15:17:08+5:30
काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात (The Kashmir Files First Week Box Office Collection) 95.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकेच नाही तर गुरुवारी रिलीजच्या 7व्या दिवशी या चित्रपटाने 18 कोटींचा गल्ला जमावला केला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढता आहे. या चित्रपटाने बुधवारी बॉक्स ऑफिसवर 18.25 कोटींची कमाई केली.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कमाई
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' ने उत्तर भारतात पहिल्या आठवड्यात सर्वात मोठा गल्ला (The Kashmir Files Box Office Collection) उत्तर भारतात केला आहे. विशेषत: दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही मोठ्या स्टार नसलेल्या या चित्रपटाने चांगला बिझनेस केला आहे. या चित्रपटाने सर्वांनाच चकित केले आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट 700 स्क्रीन्सवर रिलीज झाला. तर तिकीट खिडकीवरील गर्दी पाहून रविवारपासून स्क्रीनची संख्या 2000 हून अधिक झाली. याचा थेट परिणाम बिझनेसवर झाला. रविवारी या चित्रपटाने 15 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या सोमवारी कामाचा दिवस असूनही, चित्रपटाने पुन्हा 15 कोटींचा गल्ला जमावला आणि स्वतःच एक इतिहास रचला.
अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि क्रिती सेनॉन यांचा 'बच्चन पांडे' बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी रिलीज झाला आहे. मात्र या चित्रपटामुळे 'द काश्मीर फाइल्स'ला कोणताही धोका पोहोचणार नाही. दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारचा शेवटचा चित्रपट 'जेम्स' प्रदर्शित झाल्यामुळे दक्षिण भारतातील 'द काश्मीर फाइल्स'च्या कमाईवर नक्कीच परिणाम होईल. पण या वीकेंडला म्हणजेच होळीनंतर शनिवार आणि रविवारी चित्रपटाची कमाई 20-20 कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.