प्रतीक्षा संपली! ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ‘The Kashmir Files’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:41 PM2022-04-18T17:41:44+5:302022-04-18T17:42:36+5:30

The Kashmir Files : अनेकजण ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा कधी एकदा ओटीटीवर येतो, या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

The Kashmir Files Now To Be Released On Zee5 Vivek Agnihotri Reveals | प्रतीक्षा संपली! ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ‘The Kashmir Files’

प्रतीक्षा संपली! ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ‘The Kashmir Files’

googlenewsNext

विवेक अग्निहोत्रींच्या  ( Vivek Agnihotri ) ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files ) या सिनेमाची देशभर अभूतपूर्व चर्चा झाली. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं धुमाकूळ घातला. अगदी अनेक मोठ्या बॅनरचे सिनेमही ‘द काश्मीर फाइल्स’पुढे झाकोळून गेलेत. फक्त 25 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई करत नवा विक्रम रचला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतोय.

अनेकजण हा सिनेमा कधी एकदा ओटीटीवर येतो, या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. लवकरच हा सिनेमा ‘झी5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: ही माहिती दिली. अर्थात ओटीटीवर हा सिनेमा कधी स्ट्रिम होणार, ते मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.
अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती अशी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा गेल्या 11 मार्चला रिलीज झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटाने 248.68 कोटींची कमाई केली आहे.  

आता येणार  ‘द दिल्ली फाइल्स’ 
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा बनवून चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री  यांनी  एक नवीन फाइल उघडण्याची घोषणा नुकतीच केली आहे. ते आता ‘द दिल्ली फाइल्स’  हा सिनेमा घेऊन येणार आहेत.‘द दिल्ली फाइल्स’ कशावर आधारित असेल, त्यात काय-काय दाखवलं जाणार यावरून विवेक अग्नीहोत्री यांनी पडदा उठवला आहे. निर्मार्ता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रविवारी त्यांच्या आगामी द दिल्ली फइल्स सिनेमाबाबत डिटेल्स सांगितले. ते म्हणाले की सिनेमा 1984 च्या काळ्या अध्यायाबाबत असेल, इतकंच नाही तर यात तामिळनाडूबाबतही सांगितलं जाईल.

Web Title: The Kashmir Files Now To Be Released On Zee5 Vivek Agnihotri Reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.