The Kashmir Files:'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली पार्ट-2 ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:59 PM2022-11-30T14:59:10+5:302022-11-30T14:59:57+5:30

The Kashmir Files: IFFI कॉन्ट्रोवर्सीनंतर 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पार्ट 2 आणण्याची घोषणा केली आहे.

The Kashmir Files: 'The Kashmir Files Unreported', Vivek Agnihotri Announces Part-2 | The Kashmir Files:'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली पार्ट-2 ची घोषणा

The Kashmir Files:'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली पार्ट-2 ची घोषणा

googlenewsNext

The Kashmir Files: इस्त्रायली चित्रपट निर्माता नदाव लॅपिड (Nadav Lapid) याने 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) संतापले आहेत. त्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ शेअर करून आपला राग व्यक्त केला. यानंतर आता त्यांनी एका मुलाखतीत मोठी माहिती दिली आहे. विवेक लवकरच काश्मीरवर त्यांचा पुढचा प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. काश्मीरचे सत्य सर्वांसमोर आणणे ही माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. 

10 चित्रपट बनवू शकलो असतो
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये, ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रपोगंडा आणि अश्लील म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. विवेक अग्निहोत्रीने एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी आपला राग व्यक्त केला आणि लॅपिडला थेट चॅलेंजही दिले.

'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' 
यानंतर मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले, "मी एक निर्णय घेतला आहे आणि आता घोषणा करतोय... आमच्याकडे इतक्या कथा आणि सत्य आहे, की त्यावर 1 ऐवजी 10 चित्रपट बनवू शकलो असतो. पण आम्ही एकच चित्रपट काढायचे ठरवले. पण आता मी संपूर्ण सत्य बाहेर आणण्याचे ठरवले आहे. 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असे त्याचे शीर्षक असेल. आणि हे मी या वर्षभरात आणीन, हे मी आज ठामपणे ठरवले आहे,' अशी मोठी माहिती त्यांनी दिली.

हे प्रकरण देशाच्या सन्मानाचे आहे
विवेक पुढे म्हणाले की, 'अनरिपोर्टेड वेब सीरिजच्या स्वरूपात असेल की डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात असेल, हे मी अद्याप ठरवलेलेल नाही. येत्या काळात मी याबाबत माहिती देईल. पण, मी संपूर्ण सत्य बाहेर आणीन. आता हा विषय कलेचा राहिला नसून, देशाच्या सन्मानाचा झाला आहे. माझ्याकडे जी काही माहिती, पुरावे आहेत आणि लोक काय बोलले आहेत ते बाहेर आणणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. यातून लोकांना संपूर्ण सत्य कळेल,' असेही ते म्हणाले.

Web Title: The Kashmir Files: 'The Kashmir Files Unreported', Vivek Agnihotri Announces Part-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.