'द केरळ स्टोरी'च्या कमाईची गाडी थांबेना; नवव्या दिवशीही केलं तगडं बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 04:05 PM2023-05-14T16:05:37+5:302023-05-14T16:06:11+5:30

The kerala story: पहिल्या तीन दिवसात ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाने नवव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे. 

the kerala story box office collection crosses 100 crores just 9 days | 'द केरळ स्टोरी'च्या कमाईची गाडी थांबेना; नवव्या दिवशीही केलं तगडं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'द केरळ स्टोरी'च्या कमाईची गाडी थांबेना; नवव्या दिवशीही केलं तगडं बॉक्स ऑफिस कलेक्शन

googlenewsNext

'द केरळ स्टोरी' (the kerala story) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासून त्याच्यावरुन बरेच वाद रंगले. अनेकांनी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. तर, काही ठिकाणी याचे शो रद्द केले. मात्र, तरीदेखील या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट सुरु आहे. पहिल्या तीन दिवसात ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाने नवव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे. 

शुक्रवारी या सिनेमाने १२.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शनिवारी विकेंडच्या दिवशी या सिनेमाने पुन्हा एकदा तगडी कमाई केली. या सिनेमाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी तब्बल १९.५० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं.  त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने एकूण ११३ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगण्यात येतं. 

अदा शर्मा नव्हे 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का 'द केरळ स्टोरी'च्या शालिनी उन्नीकृष्णनचं रिअल नेम

शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य

दरम्यान, द केरळ स्टोरीपूर्वी द कश्मीर फाइल्स या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी तगडी कमाई केली होती. या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी २५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्याच्यानंतर शाहरुखच्या पठाणचा नंबर येतो. या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी २३ कोटी रुपये कमावले होते.
 

Web Title: the kerala story box office collection crosses 100 crores just 9 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.