'द केरळ स्टोरी' प्रोपोगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं उत्तर, पीडित महिलांना आणलं थेट माध्यमांसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 10:24 AM2023-05-18T10:24:47+5:302023-05-18T10:34:30+5:30

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत 'द केरळ स्टोरी'च्या संपूर्ण टीमने २६ पीडित महिलांसह हजेरी लावली.

the kerala story producer vipul shah introduces 26 real victims infront of media gave reply to those who said film is propoganda | 'द केरळ स्टोरी' प्रोपोगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं उत्तर, पीडित महिलांना आणलं थेट माध्यमांसमोर

'द केरळ स्टोरी' प्रोपोगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं उत्तर, पीडित महिलांना आणलं थेट माध्यमांसमोर

googlenewsNext

'द केरळ स्टोरी' प्रोपोगंडा आहे, यामध्ये अतिशयोक्ती आहे अशी बरीच टीका सिनेमावर होत आहे. जेव्हापासून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निर्माता विपुल शहा (Vipul Shah) यांनी आधी केरळमधील ३२ हजार मुली लव्हजिहादच्या बळी पडल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी  बदल करत ३ मुलींची कथा असल्याचं सांगितलं. सिनेमाची कथा खोटी आहे म्हणणाऱ्यांना आता निर्मात्यांनी थेट उत्तर दिलं आहे. ISIS मध्ये सामील होण्यासाठी ज्यांना प्रवृत्त केले गेले अशा २६ पिडीतांना त्यांनी माध्यमांसमोर आणलं.

काय म्हणाले विपुल शहा?

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत 'द केरळ स्टोरी'च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. तसंच पिडीत महिलांनाही या पत्रकार परिषदेत बोलावलं. माध्यमांसमोरच सिनेमातील कलाकारांनी खऱ्या आयुष्यातील या पिडीतांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी निर्माते विपुल शहा म्हणाले, " आमचा चित्रपट प्रोपोगंडा असल्याची टीका झाली. मात्र प्रेक्षकांवनी भरभरुन प्रतिसाद देत हे खोटं ठरवलं. हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चित्रपटाचं जे व्हायचं असेल ते होईल, पण आता आमचं ध्येय या मुलींना वाचवणं आहे. आम्ही चित्रपटातून तीन मुलींच्या माध्यमातून 32 हजार मुलींची गोष्ट सांगितली आहे. आकड्यावरून काही लोकांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आमचं त्यावर हेच म्हणणं आहे की चित्रपटातील तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही त्या 32 हजार पीडितांची कथा दाखवली आहे. आज मी या पीडितांना ५० लाख रुपयांची मदत देत आहे.”

दहशतवादाला धर्म नसतो पण...

दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, "दहशतवाद भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने जेव्हा केरळचा प्रश्न आला तेव्हा लगेच लोक धर्माबद्दल बोलू लागले. माझ्या मते या चित्रपटातून आम्ही इस्लाम धर्माची सेवाच केली आहे. कारण या धर्माचा गैरवापर होतोय. हा किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा.”

Web Title: the kerala story producer vipul shah introduces 26 real victims infront of media gave reply to those who said film is propoganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.