Video: आलिया भट अन् शांतनूचा कारमध्ये रोमान्स; 'मेरी जान' गाण्यातील इंटीमेट सीन सध्या चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:49 PM2022-02-22T17:49:02+5:302022-02-22T17:58:03+5:30
गंगूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक पैलू सांगणारं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhat) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. आलियाच्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक होतंय. आलियाने यात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अजय देवगणही (Ajay Devgan) आहे. त्याने यात गँगस्टर करीमलालाचं पात्र जिवंत केलं आहे. साहजिकच हा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘जब सैंया’ आणि ‘ढोलिडा’ ही दोन गाणी रिलीज झाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचं नवं गाणं ‘मेरी जान’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रदर्शनानंतर लगेचच सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे कारण या गाण्यात आलिया भट आणि शांतनू माहेश्वरी यांचा कारमधील रोमान्स चित्रत करण्यात आला आहे.
गंगूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक पैलू सांगणारं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या दोघांचं 'मेरी जान' हे चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात गंगूबाई म्हणजेच आलिया तिचा प्रियकर अफसान म्हणजेच शांतनू माहेश्वरीसोबत कारच्या मागच्या सीटवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा इंटीमेट सीन खूपच व्हायरल होत आहे.
गाण्यात कारच्या बॅक सीटवर बसलेली आलिया तिचा प्रेमी अफसान म्हणजेच शांतनूसोबत प्रेमाचे क्षण व्यतित करताना दिसत आहे. दातांमध्ये गुलाब पकडून ती शांतनूला किस करण्यासाठी प्रवृत्त करते. जेव्हा तो तिला किस करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र ती चिडते आणि त्याच्या कानाखाली मारते. पण त्यानंतर ती त्याचा राग शांतही करते. या गाण्यात आलिया आणि शांतनू यांच्यातील प्रेमळ रुसवा- फुगवा आणि भांडणाची झलक दाखवण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ-
कोण होती गंगूबाई काठियावाडी?
संजय लीला भन्साळी यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, करीम लाला गंगूबाईला आपली बहीण मानतो आणि तिला साथ देतो. गंगूबाई गुजरातमधील काठियावाड येथील रहिवासी होत्या त्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी असे म्हटले जात होते आणि तिला तिच्या पतीने 500 रुपयांना विकले होते.
गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होती. यामुळेच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. कमी वयातच गंगूबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. पण वयाच्या 16 व्या वर्षी तिला वडिलांच्या अकाउंटन्टशी प्रेम झालं आणि लग्न करून ती मुंबईत पळून आली. पण तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकलं.