माधुरी दीक्षितने सलमान खानला परिधान करायला लावलेली नाइटी, वाचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:06 IST2025-02-05T19:06:01+5:302025-02-05T19:06:53+5:30

Salman Khan And Madhuri Dixit : आज आम्ही तुम्हाला त्या गाण्याचा किस्सा सांगणार आहोत ज्यात सलमान खानने नाइटी परिधान केली होती. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती.

The nighty that Madhuri Dixit made Salman Khan wear, read this story | माधुरी दीक्षितने सलमान खानला परिधान करायला लावलेली नाइटी, वाचा हा किस्सा

माधुरी दीक्षितने सलमान खानला परिधान करायला लावलेली नाइटी, वाचा हा किस्सा

बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)ने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला जे सिनेमे केले त्यात त्याने चॉकलेट बॉयची भूमिका साकारल्या आहेत. त्याची चॉकलेट बॉयवाली इमेज प्रेक्षकांना खूप भावली. यात हम साथ साथ है, हम आपके हैं कौन, मैंने प्यार किया आणि प्यार किया तो डरना क्या यासारख्या चित्रपटाचा सहभाग आहे. आज आम्ही तुम्हाला त्या गाण्याचा किस्सा सांगणार आहोत ज्यात सलमान खानने नाइटी परिधान केली होती. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत दिसली होती. 

आम्ही सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या हम आपके हैं कौन सिनेमाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटातील दीदी तेरा देवर दीवाना गाण्यात एका सीनमध्ये सलमान खान नाइटीमध्ये दिसला होता. दरम्यान आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर सांगितले की, सलमानला नाइटी परिधान करण्यासाठी माधुरीने जिद्द केली होती. तिनेच सलमानचा मेकअप केला होता.

सूरज बडजात्या यांनी दिला आठवणींना उजाळा

स्पर्धक रितिकाने या गाण्याचे बहारदार सादरीकरण केल्यानंतर सूरज बडजात्या सगळ्यांना आठवणी सांगू लागले. ''हे एक खूपच लांबलचक आणि तपशीलवार गाणं होतं. त्याच्या तालमी १६ दिवस चालल्या आणि चित्रीकरणाला ९ दिवस लागले. आम्हाला हे गाणं मौजमजेसोबत एका उंचीवर नेऊन संपवायचं होते. या सीनसाठी सलमानने नाइटी घालावी असं मी माझ्या वडिलांना सुचवलं. सलमानने या प्रस्तावावर ताबडतोब मान डोलावली, पण माझ्या वडिलांनी ही कल्पना फेटाळली. त्यांना ते गाण्याला साजेसं वाटत नव्हतं. पण संपूर्ण टीम इतकी उत्साही होती की आम्ही यावर सेटवरच्या महिलांची मतं घ्यावीत असं ठरवलं. माधुरी दीक्षितसकट सगळ्या डान्सर्सना ही कल्पना प्रचंड विनोदी वाटली आणि हे करायलाच हवं असं त्यांनी सांगितलं. शेवटी, स्वत: माधुरीने या सीनसाठी सलमानचा मेकअप केला. त्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!''

सूरज बडजात्या यांचे ओटीटीवर पदार्पण

सूरज आर. बडजात्या यांची 'बडा नाम करेगा' ही सीरिज लवकरच सोनी लिव्हवर दाखल होते आहे. या सीरिजमधून सूरज बडजात्या ओटीटीवर पदार्पण करत आहेत. गुल्लकमुळे नावाजले गेलेले दिग्दर्शक पलाश वासवानी आणि खुद्द सूरज आर. बडजात्या या मालिकेचे शो रनर आहे व यात हृतिक घनशानी, आयेशा कडुसकर, कंवलजीत सिंग, अल्का अमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, दीपिका अमीन, जमील खान, राजेश तेलंग, अंजना सुखानी, साधिका सयाल, ग्यानेंद्र त्रिपाठी, प्रियंवदा कांत, ओम दुबे, भावेश बाबानी व अशा कितीतरी कलाकारांचा समावेश आहे. 

Web Title: The nighty that Madhuri Dixit made Salman Khan wear, read this story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.