आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:27 PM2022-09-08T17:27:23+5:302022-09-08T17:27:52+5:30

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा आलिया भटवर केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

The person behind Alia Bhatt's success, Aishwarya Rai's 'it' statement in discussion | आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत

आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) ही एक अप्रतिम अभिनेत्री आहे. 'राझी'पासून 'गंगूबाई काठियावाडी'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. पण आलियाचा चित्रपट प्रवास खूप सोपा झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर नसलेले अभिनेते किंवा नवीन चेहऱ्यांच्या तुलनेत आलिया भटला सहजपणे चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. आलिया भटच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच करण जोहर(Karan Johar)चा खूप पाठिंबा मिळाला आहे. त्याने आलियाला चित्रपटामध्ये लॉन्च केले आहे. आलियाला मिळालेल्या या 'सुवर्ण संधी'वर ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan)नेही आपले मत व्यक्त केले आहे.

२०१८ मध्ये, जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन तिच्या 'फन्ने खान' चित्रपटाचे प्रमोशन करत होती, तेव्हा तिने 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत आलिया भटच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा केली होती. पण त्याचवेळी आलियाला करण जोहरकडून खूप पाठिंबा मिळाल्याचेही बोलले जात होते. चित्रपटांच्या ऑफर्स तिच्यापर्यंत पोचतात. ऐश्वर्या रायच्या याच मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे.


ऐश्वर्या म्हणाली होती, 'ती खूप पुढे जाईल. आलिया तिच्या कामाचा आनंद घेत आहे आणि ते एक्सप्लोअर करत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. ती चित्रपटांमध्ये चांगले काम करत आहे. मी स्वतः आलियाला असेही सांगितले की करणने (जोहर) तुला ज्या प्रकारचा पाठिंबा दिला आहे तो तुझ्यासाठी चांगला आहे. त्याने तुला सुरुवातीपासूनच साथ दिली आहे. सुरुवातीपासूनच अशा प्रकारचे समर्थन मिळणे खूप आरामदायी आहे. तेव्हा इंडस्ट्रीत पाय रोवणं फारसे अवघड नसते. हे ऐकून आलिया हसली. एक अभिनेत्री म्हणून तुझ्यासाठी हे खूप छान आहे कारण तुमच्या पुढे चांगले काम आहे आणि पुढे मोठ्या संधी आहेत. पण मुद्दा असा आहे की ती चांगलं काम करत आहे. त्यासोबतच तिला नियमित चांगल्या संधीही येत आहेत, ज्या तिच्या झोळीत पडत आहेत.

ऐश्वर्या राय सध्या तिच्या 'पोनियान सेल्वन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तिचा पीएस-१ हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: The person behind Alia Bhatt's success, Aishwarya Rai's 'it' statement in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.