अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:45 PM2023-11-07T15:45:56+5:302023-11-07T16:12:58+5:30

अलीकडच्या काळात या माध्यमातून चुकीच्या गोष्टी वेगाने पसरवल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी याला बळी पडले आहेत.

The real face behind actress Rashmika Mandana's deepfake video; Who is Zara Patel? | अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

मुंबई – सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका डीपफेक व्हिडिओवरून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा चेहरा वापरून हा व्हिडिओ व्हायरल केला. परंतु रिअल व्हिडिओ जी दिसते तिचं नाव जारा पटेल असं आहे. रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओवरून फिल्म इंडस्ट्रीज बरीच चर्चा झाली. आता या व्हिडिओवरून जिचा हा व्हिडिओ आहे तिने समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.

या मुलीचे नाव जारा पटेल असून तिने इन्स्टाग्रामवर निवेदन जारी केले आहे. या घटनेमुळे मी व्यथित असल्याचे ती म्हणाली. जारा पटेल म्हणते की, मला त्या महिला आणि मुलींच्या भविष्याची चिंता वाटते. ज्यांना स्वत:बद्दल सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून भीती वाटते. त्यामुळे जे तुम्ही इंटरनेटवर पाहता त्याची पडताळणी एकदा करून घ्या. इंटरनेटवर दिसणारे सर्वकाही खरे असते असं नाही.

कोण आहे जारा पटेल?
या डीपफेक व्हिडिओत जाराचा चेहरा एडिट करून त्यावर रश्मिका मंदानाचा चेहरा लावला आहे. जारा पटेल ही एक ब्रिटीश भारतीय इन्फ्लुएंसर आहे. जिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ४.५० लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. ती या सोशल मीडिया अकाऊंटवरून बोल्ड कंटेट शेअर करते, तिच्या इन्स्टा बायोनुसार, ती एक फुलटाईम इंजिनिअर आणि मेंटल हेल्थ एडवोकेट आहे. याचसोबत ती तिच्या फोलोअर्ससाठी बोल्ड कंटेट बनवते.

कधी शेअर केला होता खरा व्हिडिओ?

जारा पटेलनं ९ ऑक्टोबरला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती काळ्या रंगाचे कपडे घालून एका लिफ्टमध्ये प्रवेश करते. तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, तुम्ही लिफ्टचा दरवाजा माझ्यासाठी बंदच केला होता. परंतु सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करून जाराच्या चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा लावला होता.

या व्हिडिओवरून रश्मिकाने मला खूप दु:ख होत आहे, मला ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडिओवर बोलावं लागतंय. प्रामाणिकपणे सांगते, हे असं काही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर आपल्यातील प्रत्येकासाठी अत्यंत भयानक आहे. आज तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्यानं खूप जास्त नुकसान होत आहे अशा भावना तिने व्यक्त केल्या. डीपफेक आर्टिफिशियल इंटेलिंजेंसचा वापर करून हा व्हिडिओ बनवला जातो. अलीकडच्या काळात या माध्यमातून चुकीच्या गोष्टी वेगाने पसरवल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी याला बळी पडले आहेत.

Web Title: The real face behind actress Rashmika Mandana's deepfake video; Who is Zara Patel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.