Tiger 3 ची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमाच्या यशासाठी मेकर्सची मोठी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 15:57 IST2023-10-13T15:57:20+5:302023-10-13T15:57:59+5:30
दिवाळीच्या मुहुर्तावर Tiger धडक देत आहे.

Tiger 3 ची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमाच्या यशासाठी मेकर्सची मोठी खेळी
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) ची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमाच्या टीझर आणि पोस्टर नंतर तर ही आतुरता आणखी वाढली आहे. सलमान खान टायगर ३ मधून तुफानच घेऊन येतोय. दरम्यान १० नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार असल्याची चर्चा होती. आता मात्र रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामागेही मेकर्सची मोठी खेळी आहे.
'टायगर 3' कधी रिलीज होणार यावरुन अखेर पडदा उठला आहे. मेकर्सने रिलीज डेट १२ नोव्हेंबर केली आहे. विशेष म्हणजे रविवारी रिलीज होणारा पहिलाच हिंदी सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या यशासाठी मेकर्सने ही मोठी खेळी केली आहे. तसंच दिवाळीच्या मुहुर्तावर टायगर धडक देत आहे. सुट्ट्यांचा फायदा सिनेमाला होणार यात शंका नाही. पण आता रविवार या सुट्टीच्या दिवशीच सिनेमा रिलीज झाल्यानंतर याचं ओपनिंग कलेक्शन काय होतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3 दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होत आहे. १३ तारखेला अमावस्या असून त्या दिवशी सिनेमा रिलीज करता येणार नाही. तर १४ आणि १५ तारखेला गोवर्धन पूजा आणि भाऊबीज आहे. मेकर्सने सुरुवातीच्या सुट्ट्यांचा फायदा घ्यायची योजना आखली आहे.'
'टायगर 3'मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ अॅक्शन करताना दिसणार आहेत. पहिल्या दोन्ही भागातील त्यांचा अभिनय, अॅक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. तर आता टायगर ३ मध्ये इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत आहे. 16 ऑक्टोबरला सिनेमाचा ट्रेलर भेटीस येत आहे.