रणबीर कपूरच्या 'रामायण'चं शूटिंग संपलं! चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:58 PM2024-09-09T16:58:49+5:302024-09-09T16:59:32+5:30
Ranbir Kapoor's 'Ramayan' : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रामायणमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा आगामी चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie)मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. यात रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहते पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्याचे तर्क लावत आहेत.
रणबीर कपूरच्या एक्स फॅन पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात अभिनेता एक फॅनसोबत पोझ देताना दिसत आहे. रणबीरने पर्पल हुडी आणि कॅप घातलेली दिसत आहे. दुसऱ्या फोटोत क्रूमधील लोकांसोबत एकत्र फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. फोटोत मोठा सेटही दिसत आहे. असं म्हटलं जात आहे की, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे आणि चित्रपटाचे व्हिएफएक्सवर काम सुरू झालं आहे.
wrap it up and let the colors unfold #Ramayanapic.twitter.com/T5FevvqoiL
— 𝙑 ♪ (@RKs_Tilllast) September 7, 2024
'रामायण'चे बजेट आहे इतके कोटी
पिंकविलाने काही दिवसांपूर्वी रिपोर्टमध्ये म्हटले होते की, नितेश तिवारी आणि त्यांची टीम 'रामायण' दोन भागांची सीरिज म्हणून विकसित करत आहेत. यात रणबीर कपूरशिवाय सई पल्लवी, सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'रामायण'चे दोन्ही भाग एकत्र शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कारण चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग वर्षभरात प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'रामायण'च्या पहिल्या भागाचे बजेट ८३५ कोटी रुपये आहे.
रणबीर कपूरचे वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूरकडे 'रामायण' व्यतिरिक्त आणखी दोन चित्रपट आहेत. यात ॲनिमल पार्क आणि लव्ह अँड वॉर यांचा समावेश आहे. हे सिनेमे थिएटरमध्ये बॅक टू बॅक रिलीज होतील. गेल्या वेळी रणबीर कपूर 'ॲनिमल' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसला होता, ज्याने जगभरात ९०० कोटींचा व्यवसाय केला होता.