भाईजानच्या 'सिंकदर'समोर 'छावा'चं वादळ शमलं, 'एल २: एम्पुरान'ची बिकट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:47 IST2025-04-03T11:46:00+5:302025-04-03T11:47:13+5:30

Chhaava, Sikandar And L2: Empuraan : २०२५ सालातील सर्वात तीन मोठे चित्रपट 'सिंकदर', 'छावा' आणि 'एल २: एम्पुरान' यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

The storm of 'Chhaava' subsided before Bhaijaan's 'Sinkadar', 'L2: Empuraan' is in a dire state | भाईजानच्या 'सिंकदर'समोर 'छावा'चं वादळ शमलं, 'एल २: एम्पुरान'ची बिकट अवस्था

भाईजानच्या 'सिंकदर'समोर 'छावा'चं वादळ शमलं, 'एल २: एम्पुरान'ची बिकट अवस्था

२०२५ सालातील सर्वात तीन मोठे चित्रपट 'सिंकदर' (Sikandar Movie), 'छावा' (Chhaava Movie) आणि 'एल २: एम्पुरान' (L2: Empuraan Movie) यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सलमान खानचा सिकंदर चित्रपट रिलीज होताच ६०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणाऱ्या छावा सिनेमाची गती मंदावताना दिसत आहे. तर मोहनलाल अभिनीत 'एल २: एम्पुरान'ची तर बिकट अवस्था पाहायला मिळत आहे.

२०२५ साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 'छावा'ची ताकद आता बॉक्स ऑफिसवर कमी होत आहे. हे नक्की होणार होते कारण एक तर चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तर दुसरीकडे तिकीटबारीवर सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपटही झळकला आहे. सिकंदरची अपेक्षेप्रमाणे फारशी कमाई होत नसली तरी छावा चित्रपटाचा वेग मंदावला आहे. त्याचवेळी सिकंदरच्या तीन दिवस आधी प्रदर्शित झालेला सुपरस्टार मोहनलालचा 'एल २: एम्पुरान' हा सिनेमाची आठवडाभरातच बिकट अवस्था झाली आहे.

'सिंकदर'समोर 'छावा'ने टेकले गुडघे
विकी कौशल स्टारर ऐतिहासिक ड्रामा 'छावा' रिलीज होऊन ४८ दिवस उलटले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. सॅकन्लिकच्या रिपोर्टनुसार, छावाने ४६व्या दिवशी १.२७ कोटी रुपये कमावले. त्याच वेळी, ४७व्या दिवशी त्याच्या कमाईत घट झाली आणि चित्रपटाने केवळ ५४ लाखांची कमाई केली आहे. आता ४८व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत, त्यानुसार चित्रपटाच्या कमाईत आणखी घसरण झाली आहे. छावाने ४८व्या दिवशी ४० लाख रुपये कमावले, त्यानंतर त्याची एकूण कमाई ५७५.३ कोटी रुपये झाली आहे. दुसरीकडे, सिकंदरने चौथ्या दिवशी ९.७८ कोटी रुपये कमावले, त्यानंतर त्याची एकूण कमाई ८४.२५ कोटी रुपये झाली आहे.

'एल २: एम्पुरान'च्या सातव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
सुपरस्टार मोहनलाल अभिनीत 'एल २: एम्पुरान'चे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन यांनी केले आहे. हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘लुसिफर’ चित्रपटाचा सीक्वल आहे. २१ कोटींची शानदार ओपनिंग असलेल्या या चित्रपटाचा वेग मंदावला आहे. आता चित्रपट प्रदर्शित होऊन ७ दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ४.३ कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर चित्रपटाची एकूण कमाई ८२.७३ कोटी रुपये झाली आहे. मात्र, १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुरुवातीला सर्वात वेगवान चित्रपट म्हणून ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊन मल्याळम इंडस्ट्रीत इतिहास रचला होता, मात्र आता हळूहळू त्याची कमाई कमी होत आहे.
 

Web Title: The storm of 'Chhaava' subsided before Bhaijaan's 'Sinkadar', 'L2: Empuraan' is in a dire state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.