पॅरालिम्पिक महिला क्रिकेटर्संची कहाणी, बॉक्स ऑफिसवर 'एका तिकीटावर एक फ्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:44 PM2023-08-23T16:44:48+5:302023-08-23T16:47:15+5:30
अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर' प्रदर्शित झाला आहे. 'घूमर' ही पॅराप्लेजिक खेळाडूची प्रेरणादायी कथा आहे.
मुंबई - बॉक्स ऑफिसवर सध्या सिनेमांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. ऑगस्ट हा सुट्ट्यांचा महिना असल्याने आणि सध्या पिकनिक व सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बहुतांश सिनेरसिक सिनेमागृहांकडे वळाले आहेत. त्यातच, सनी देओलचा गदर २ आणि अक्षय कुमारच्या ओएमजी२ सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही सिनेमांसाठी बॉक्स ऑफिस हाऊसफुल्ल होत असतानाच, घुमर चित्रपटानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरची मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाला समिक्षकांची पसंती आहे. त्यामुळेच, आता चित्रपटांच्या तगड्या स्पर्धेत दिग्दर्शकाने चाहत्यांना भेट दिलीय.
अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर' प्रदर्शित झाला आहे. 'घूमर' ही पॅराप्लेजिक खेळाडूची प्रेरणादायी कथा आहे. या चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. आता, चित्रपटही चाहत्यांना आवडला आहे. अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत असून सैयामी महिला क्रिकेटर असून गोलंदाज आहे. चित्रपटात शबाना आझमी यांचीही लहान भूमिका असून मेगास्टार अमिताभ चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचा भाग आहेत. तगडी स्टारकास्ट असतानाही चित्रपट मनोरंजनाच्या स्पर्धेत पिछाडीवर पडल्याने निर्मात्याने प्रेक्षकांसाठी ऑफर सुरू केली आहे.
घुमर चित्रपटाच्या निर्मात्याने चाहत्यांना भेट दिलीय. त्यानुसार, चित्रपटाचे एक तिकीट खरेदी केल्यास दुसरे तिकीट फ्री मिळणार आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आत्तापर्यंत ४.०९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी जवळपास २० कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे. चित्रपट समिक्षक आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती देणार तरण आदर्श यांनी चित्रपटासंदर्भात ऑफरची माहिती देत पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, आयनॉक्स, पीव्हीरआर, सिनेपोलीसच्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.
‘GHOOMER’ BUY ONE GET ONE TICKET FREE… #Ghoomer book tickets now… Watch #GhoomerInCinemasNow. #RBalki#PENMarudharpic.twitter.com/TFg2nfjPAy
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2023