तयार आहे 'स्त्री ३'ची कहाणी! श्रद्धा कपूरने 'स्त्री'च्या तिसऱ्या भागासंदर्भात दिली मोठी अपडेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:12 PM2024-10-19T14:12:40+5:302024-10-19T14:13:46+5:30

'स्त्री २' (Stree 2) चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०१८ साली रिलीज झालेला हॉरर कॉमेडी सिनेमा स्त्रीचा हा सीक्वल आहे.

The story of 'Stree 3' is ready! Shraddha Kapoor gave a big update regarding the third part of 'Stree'? | तयार आहे 'स्त्री ३'ची कहाणी! श्रद्धा कपूरने 'स्त्री'च्या तिसऱ्या भागासंदर्भात दिली मोठी अपडेट?

तयार आहे 'स्त्री ३'ची कहाणी! श्रद्धा कपूरने 'स्त्री'च्या तिसऱ्या भागासंदर्भात दिली मोठी अपडेट?

'स्त्री २' (Stree 2) चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  धुमाकूळ घातला. २०१८ साली रिलीज झालेला हॉरर कॉमेडी सिनेमा स्त्रीचा हा सीक्वल आहे. हा चित्रपट जवळपास दोन महिने थिएटरमध्ये होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) मुख्य भूमिकेत आहेत. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने जगभरात ८५६ कोटींहून जास्त कमाई केली आहे. मात्र, आता चित्रपटाच्या यशावरून वाद सुरू झाला. अनेक लोक सिनेमाच्या यशाचे श्रेय श्रद्धाला देत होते, तर काहींनी यासाठी राजकुमार रावचे नाव घेतले.

श्रद्धाने सांगितले स्त्री २च्या यशाचे रहस्य 
आता अखेर श्रद्धाने यावर आपले मौन सोडले आणि स्त्री २च्या यशाचे कारण सांगितले. अलिकडेच, मुंबईत स्क्रीन मॅगझिनच्या रिलाँच इव्हेंटमध्ये स्क्रीन लाइव्ह सत्रादरम्यान, श्रद्धा कपूर म्हणाली की हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. चित्रपट हिट होणार की नाही हे शेवटी प्रेक्षक ठरवतात. तुम्हाला प्रेक्षकांना काहीतरी द्यायचे आहे जे त्यांना थिएटर्सकडे खेचून आणेल आणि त्यांचे मनोरंजन होईल. ती म्हणाली की, जेव्हा मी त्याची स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकली तेव्हा मी हसत हसत खाली पडले.

स्त्री ३बद्दल अभिनेत्री म्हणाली...
स्त्री ३बाबत अभिनेत्री म्हणाली की, चित्रपटाची कथा तयार आहे. अमर कौशिक याबद्दल कधी बोलतील याची मला उत्सुकता आहे. स्त्री २ अजूनही थिएटरमध्ये चालू आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटिया यांचाही कॅमिओ आहे.

Web Title: The story of 'Stree 3' is ready! Shraddha Kapoor gave a big update regarding the third part of 'Stree'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.