'लाल सिंग चड्ढा' सोबत चित्रपटगृहात लाँच होणार किरण रावच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:34 PM2022-08-09T13:34:00+5:302022-08-09T13:34:29+5:30

Laal Singh Chaddha Movie: 'लाल सिंग चड्ढा' सोबत 'लापता लेडीज'चा पहिला टीझर ११ ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

The teaser of Kiran Rao's upcoming project will be launched in theaters along with 'Lal Singh Chadha' | 'लाल सिंग चड्ढा' सोबत चित्रपटगृहात लाँच होणार किरण रावच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर

'लाल सिंग चड्ढा' सोबत चित्रपटगृहात लाँच होणार किरण रावच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर

googlenewsNext

निर्माती- दिग्दर्शक किरण राव (Kiran Rao) तिचा आगामी 'लापता लेडीज' या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha Movie) सोबत 'लापता लेडीज'चा पहिला टीझर ११ ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. किरण रावचा पहिला चित्रपट 'धोबी घाट'ला दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर, आता चित्रपट निर्माती आपला पुढचा दिग्दर्शकीय प्रोजेक्ट 'लापता लेडीज' (Laapta Ladies) भेटीला घेऊन येत आहे.

२००१ मध्ये स्थापित, ग्रामीण भारतातील एका ठिकाणी, 'लापता लेडीज' दोन तरुण नववधू ट्रेनमधून हरवल्यावर झालेल्या मजेदार गोंधळावर आधारीत आहे. चित्रपटाच्या मजेशीर आणि मनोरंजक शीर्षकाव्यतिरिक्त, निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल फारच कमी माहिती दिली आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांचा समावेश आहे आणि दोन अतिशय प्रतिभावान तरुण अभिनेत्रींना वधूच्या भूमिकेत लॉन्च करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप त्यांच्या नवीन प्रमुख अभिनेत्रींची नावे जाहीर केलेली नाहीत.

'लापता लेडीज'चे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान आणि किरण राव यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून याची पटकथा, बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले आहेत आणि अतिरिक्त संवाद लेखन दिव्यानिधी शर्मा यांनी केले आहे.

Web Title: The teaser of Kiran Rao's upcoming project will be launched in theaters along with 'Lal Singh Chadha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.