Kajol: अजय देवगणशी लग्न करणं काजोलसाठी ठरलं गेम चेंजर, अभिनेत्रीने सांगितलं या मागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 13:49 IST2023-06-21T13:19:41+5:302023-06-21T13:49:38+5:30
लग्नाच्या अनेक वर्षानंतर काजोलने खुलासा केला की, अजयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेणं तिच्यासाठी कठीण होते.

Kajol: अजय देवगणशी लग्न करणं काजोलसाठी ठरलं गेम चेंजर, अभिनेत्रीने सांगितलं या मागचं कारण
बॉलिवूड अभिनेत्री काजोल(Kajol)ने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाने लोकांना वेड लागले आहे. काजोल सध्या तिच्या आगामी वेब सीरिज द ट्रायलमुळे चर्चेत आहे. काजोल यावेबसिरीजमध्ये एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच, काजोलने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही किस्से शेअर केले आणि अजय देवगणशी लग्न करण्याचा निर्णय तिच्यासाठी का कठीण होता याचा खुलासा केला आहे.
काजोलने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही खुलासे केले. यासोबतच अजयसोबत लग्न करणं हा निर्णय घेणं तिच्यासाठी कठीण का होते ते ही सांगितलं आहे. काजोल म्हणाली, 'खरंच. माझ्या आयुष्यात अनेकदा कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत. खरं म्हणजे माझं करिअर यशाच्या शिखरावर असताना मी लग्न केलं. हे लग्नही माझ्यासाठी गेम चेंजर ठरले कारण मला चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे की नाही हे ठाऊक नव्हते.
१९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटादरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते.काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला.
दरम्यान काजोल तिच्या OTT पदार्पणाला घेऊन खूप उत्साहित आहे. नुकताच 'द ट्रायल'चा टीझर लाँच करण्यात आला, ज्यामध्ये काजोलचा दमदार अवतार पाहायला मिळाला. चाहते या सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही कोर्टरूम ड्रामा मालिका 14 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल, ज्यामध्ये आठ भाग आहेत.काजोल शेवटची सलाम वेंकी या चित्रपटात दिसली होती, ज्याची जोरदार चर्चा झाली होती.