'मासूम' चित्रपटाचा येणार सीक्वल, शेखर कपूर यांनी स्क्रीप्टच्या कामाला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 04:44 PM2023-06-06T16:44:28+5:302023-06-06T16:44:59+5:30

Masoom : मासूम... द न्यू जनरेशन हा चित्रपट कल्ट क्लासिक चित्रपट 'मासूम'चा बहुप्रतिक्षित सिक्वेल असणार आहे.

The upcoming sequel of 'Masoom', Shekhar Kapur has started the script work | 'मासूम' चित्रपटाचा येणार सीक्वल, शेखर कपूर यांनी स्क्रीप्टच्या कामाला केली सुरूवात

'मासूम' चित्रपटाचा येणार सीक्वल, शेखर कपूर यांनी स्क्रीप्टच्या कामाला केली सुरूवात

googlenewsNext

नेहमीच वेगळ्या विषयावर चित्रपट करणारे शेखर कपूर हे लवकरच एका नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन  करणार असल्याचं समजतंय. त्यांचा नुकत्याच आलेल्या व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिल्यानंतर शेखर कपूर पुन्हा नव्या जोमाने नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. शेखर कपूर "मासूम... द न्यू जनरेशन" या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करत आहेत. हा चित्रपट कल्ट क्लासिक चित्रपट 'मासूम'चा बहुप्रतिक्षित सिक्वेल असणार आहे. लवकरच शेखर कपूर यांची अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. हल्लीच ते भारतात आले असताना या चित्रपटासाठी अनेक मीटिंग झाल्याचं देखील कळतंय ! 

शेखर कपूर यांनी २१ ऑक्टोबर १९८३ रोजी मासूम दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिक चित्रपटाचा देखील दर्जा प्राप्त केला. शेखर कपूरच्या "बॅन्डिट क्वीन" आणि "मिस्टर इंडिया" सारख्या इतर आयकॉनिक चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. 

चित्रपटसृष्टीतील शेखर कपूरच्या योगदानामुळे केवळ भारतीय चित्रपसृष्टी नाही तर त्यांनी घडवलेल्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान मिळाला. सिनेमाद्वारे शोध लागण्यापूर्वी त्यांनी केट ब्लँचेट, एडी रेडमायन आणि हेथ लेजर यांसारख्या अभिनेत्यांसह काम केले होते. चित्रपसृष्टीत एक वेगळा दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न आजही तितक्याच जोमाने सुरू आहे.

Web Title: The upcoming sequel of 'Masoom', Shekhar Kapur has started the script work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.