"शाहरुखच्या टीमने माझ्यावर हल्ला केला", विवेक अग्निहोत्रींचे किंग खानवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:16 PM2023-10-02T13:16:31+5:302023-10-02T13:17:51+5:30

विवेक अग्निहोत्रींनी 'जवान' चित्रपटाबाबत वक्तव्य करत शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत अग्निहोत्रींनी शाहरुख खानवर गंभीर आरोपही केले आहेत.

the vaccine war movie vivek agnihotri alleged shah rukh khan said his social media team attacked me | "शाहरुखच्या टीमने माझ्यावर हल्ला केला", विवेक अग्निहोत्रींचे किंग खानवर गंभीर आरोप

"शाहरुखच्या टीमने माझ्यावर हल्ला केला", विवेक अग्निहोत्रींचे किंग खानवर गंभीर आरोप

googlenewsNext

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. करोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी भारतीय तज्ञांनी दिलेल्या योगदानावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. पण, प्रेक्षकांच्या अपेक्षेस हा चित्रपट खरा उतरला नसल्याने विवेक अग्निहोत्रींच्या द व्हॅक्सीन वॉरकडे चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. 

तर दुसरीकडे किंग खानचा 'जवान' चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी 'जवान' चित्रपटाबाबत वक्तव्य करत शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अग्निहोत्रींनी शाहरुख खानवर गंभीर आरोपही केले आहेत. जवान आणि पठाणबाबत अग्निहोत्री म्हणाले, "मी नेहमीच त्याच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पण, त्याचे चित्रपट मला उथळ वाटतात. हे चित्रपटाचे स्टँडर्ड असू शकत नाही. मला वाटतं यापेक्षा तो चांगले चित्रपट करू शकतो." 

या मुलाखतीत अग्निहोत्रींनी किंग खानवर गंभीर आरोपही केले आहेत. "शाहरुखच्या सोशल मीडिया टीमकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या एजन्सीकडून ट्रोल आणि बॉट्स बनवले गेले आहेत. ज्यांच्याद्वारे माझ्यावर हल्ला केला गेला आहे," असं अग्निहोत्रींनी म्हटलं आहे. 

दरम्यान, २८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'द व्हॅक्सीन वॉर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाने चार दिवसांत केवळ सहा कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाबरोर प्रदर्शित झालेले 'चंद्रमुखी २' आणि 'फुकरे ३' हे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहेत. 
 

Web Title: the vaccine war movie vivek agnihotri alleged shah rukh khan said his social media team attacked me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.