अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी भेटीला येणार 'सिकंदर'चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:16 IST2025-02-17T16:16:17+5:302025-02-17T16:16:58+5:30

Sajid Nadiadwala : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला यावेळी त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करणार आहे. १८ फेब्रुवारीला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी आणि सिनेप्रेमींसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे.

The wait is finally over! The trailer of 'Sikander' will be released on this day | अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी भेटीला येणार 'सिकंदर'चा ट्रेलर

अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी भेटीला येणार 'सिकंदर'चा ट्रेलर

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यावेळी त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करणार आहे. १८ फेब्रुवारीला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी आणि सिनेप्रेमींसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे. या खुलाशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी सलमान खान(Salman Khan)च्या वाढदिवशी 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, जो पाहून चाहते वेडे झाले होते. आता 'सिकंदर'बद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे, कारण साजिद नाडियाडवालाच्या वाढदिवसाला चित्रपटाचा नवा लूक, मोशन पोस्टर किंवा ट्रेलर रिलीज होऊ शकतो, असा अंदाज चाहत्यांना आहे.

सलमान खान स्टारर 'सिकंदर' हा २०२५ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहेत आणि या सिनेमात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शर्मन जोशी, सत्यराज आणि प्रतीक बब्बर हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सिकंदर' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

राहुल रॉयची 'सिकंदर'मध्ये एन्ट्री?
आशिकी चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला राहुल रॉय सिकंदर या चित्रपटात सलमानसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान सिकंदरच्या लूकमध्ये दिसत होता. राहुल रॉयने यापूर्वीही सलमान खानसोबत काम केले आहे. दोघेही १९९६ मध्ये रिलीज झालेल्या मजधर चित्रपटात दिसले होते. यात मनीषा कोईरालाही मुख्य भूमिकेत होती. इतकेच नाही तर सलमानने राहुलला त्याच्या वाईट काळात मदत केली होती. बॉलिवूड हंगामासोबतच्या मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला होता की सलमानने वाईट काळात त्याचे कर्ज फेडले होते.

Web Title: The wait is finally over! The trailer of 'Sikander' will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.