​पाकिस्तानात नाट्यअभिनेत्रीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 08:54 PM2016-11-25T20:54:00+5:302016-11-25T20:54:00+5:30

पाकिस्तानमधील लाहोर शहरात गुरुवारी किस्मत बेग या अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ती स्टेज परफॉर्मन्स दिल्यावर घराकडे परतत ...

Theater of theater in Pakistan | ​पाकिस्तानात नाट्यअभिनेत्रीची हत्या

​पाकिस्तानात नाट्यअभिनेत्रीची हत्या

googlenewsNext
ong>पाकिस्तानमधील लाहोर शहरात गुरुवारी किस्मत बेग या अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ती स्टेज परफॉर्मन्स दिल्यावर घराकडे परतत असताना अज्ञात इसमांनी तिच्यावर ११ गोळ्या झाडल्या. 

 लाहोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरसायकल आणि कार घेऊन आलेल्या काही अज्ञात लोकांनी अभिनेत्री किस्मतला थांबवले आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर किस्मत आणि तिच्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे किस्मतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या ड्रायव्हरची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते. अभिनेत्री किस्मतच्या हत्येमागे तिचा पूर्वाश्रमीच्या प्रियकराचा हात असा संशय पोलिसांचा आहे. 

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी याघटनेबद्दल माहिती देताना म्हणाले, हल्लेखोर थिएटरबाहेर किस्मतची वाट पाहत होते. ती घरी जाण्यासाठी निघताच त्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तिला वाटेत एका ठिकाणी अडविण्यात आले व तिच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापूर्वी देखील तिच्यावर अशाच प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यावेळी ती त्यातून बचावली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पाकमधील फैसलाबाद शहरातील एका व्यावसायिकाशी तिचे संबंध होते असे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस चौकशीसाठी संबंधित व्यावसायिक व किस्मतच्या नातेवाईकांना बोलविणार असून, लवकरच या हल्लेखोरांना शोधून काढण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. 

Stage Actress Kismat Baig Shot In Lahore

किस्मतची आई म्हणाली की, आमच्या कुटुंबाचे कोणाशीही वैर नव्हते. किस्तमची हत्या करून काय मिळविले असा सवालही तिने केला. अशा प्रकारे हत्या झालेली किस्मत ही पहिली नाट्य अभिनेत्री नव्हे. यापूर्वी, नादरा, नागू, यास्मिन, नैना, नगिना, मार्वी, करिष्मा, संगम आणि आरजू या नाट्य अभिनेत्रींचाही त्यांचे पूर्वाश्रमीचे प्रियकर आणि त्यांच्या शत्रूंकडून हत्या करण्यात आल्या होत्या.

Web Title: Theater of theater in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.