'लगान' सिनेमातील टीपू आता काय करतो आणि कसा दिसतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 18:34 IST2021-10-18T18:28:15+5:302021-10-18T18:34:01+5:30
'हंगाामा' सिनेमात भोलूची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे अमीन गाजी. अमीन मुंबईच जन्मला आणि शिकलाही इथेच.

'लगान' सिनेमातील टीपू आता काय करतो आणि कसा दिसतो?
२००३ मध्ये आलेला कॉमेडी ''हंगामा' सिनेमा चांगलाच हिट झाला होता. या सिनेमाच कॉमिक टायमिंग इतकं परफेक्ट आहे की, आजही हा सिनेमा पुन्हा पाहिला तरी पोटधरून हसू येईल. हा खरंच भन्नाट सिनेमा होता. हिरो-हिरोईनपासून ते व्हिलनपर्यंत सगळेच सिनेमात लोकप्रिय चेहरे होते. याच सिनेमात एक साइड कॅरेक्टर होतं. ज्याच्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. आम्ही तुम्हाला सांगतोय दूधवाला उर्फ कमिशन खोर 'भोलू'बाबत. आठवलं नाही.
आता तर तुम्हाला आठवण आली असेलच, या कलाकाराचं नाव आहे अमीन गाजी. अमीन गाजीची 'लगान' सिनेमातीलही भूमिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आजकाल हा काय करतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'हंगाामा' सिनेमात भोलूची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे अमीन गाजी. अमीन मुंबईच जन्मला आणि शिकलाही इथेच. त्याने लहान वयातच सिनेमात बालकलाकार म्हणून काम करणं सुरू केलं होतं. त्याचा पहिला सिनेमा 'लगान' होता. यात त्याने टीपूची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका सर्वांनाच आठवत असेल.
यानंतर अमीनने 'मातृभूमि: ए नेशन विदाउट वुमेन', 'हंगामा', 'खेले हम जी जान से' सारख्या सिनेमातही काम केलं. अमीन ने POGO चॅनलवर Cambala Investigation Agency नावाचा एक शो सुद्धा केला होता. जो चांगलाच लोकप्रिय झाला होता.
आता अमीन लवकरच गॅंगस्टर विकास दुबेवर तयार होत असलेल्या 'हनक' सिनेमात दिसणार आहे. त्याची या सिनेमातील भूमिका कोणतीह आहे हे समजू शकलेलं नाही. पण लूकवरून भूमिका गॅंगस्टरचीच असणार आहे दिसतंय.