'लग्नानंतर नात्यात रोमान्स रहात नाही'; जया बच्चन यांचं वक्तव्य चर्चेत; नेमकं घडलं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:25 AM2024-01-30T10:25:26+5:302024-01-30T10:28:44+5:30
Jaya Bachchan: अलिकडेच जया बच्चन यांनी श्वेता बच्चन आणि नव्या नंदा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं.
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan )सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या फटकळ स्वभावामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे. बिग बी आणि जया बच्चन यांची उत्तम केमिस्ट्री साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यांचं अफेअर ते लग्नापर्यंतचा प्रवास अनेकदा चर्चिलाही गेला आहे. मात्र, लव्ह मॅरेज केल्यानंतरही नात्यात आता रोमान्स राहिलेला नाही, असं विधान जया बच्चन यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान आता सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
अलिकडेच जया बच्चन यांनी श्वेता बच्चन आणि नव्या नंदा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. 'व्हाट द हेल, नव्या' या पॉडकास्टचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं. या प्रोमोमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नावर आणि लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या फरकाविषयीदेखील मत मांडलं.
'जया-इंग' या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? असा प्रश्न नव्या, जया बच्चन यांना विचारते. त्यावर, त्या या शब्दाचा अर्थ सांगतात. सोबतच लग्नानंतरचं नवरा-बायकोचं नातं कसं असतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. "लग्नानंतर रोमान्स खिडकीतून बाहेर निघून जातो. लग्नानंतर तो निघून जातो", असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यावर श्वेताने सुद्धा प्रतिक्रिया दिली. 'मला माहितीये माझ्या घरात काय घडतंय', असं श्वेता म्हणाली.
काय आहे जया-इंगचा अर्थ?
एकदा नव्याने जया-इंग या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावेळी या शब्दाचा नेमका अर्थ काय? असं तिला विचारण्यात आलं होतं. या शब्दाचा अर्थ तिने नुकताच सांगितला आहे. जया-इंग म्हणजे एखाद्याला सतत सुचना देणे किंवा शिक्षकांप्रमाणे वागणे असा होतो.