'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:56 PM2023-01-10T13:56:03+5:302023-01-10T13:56:45+5:30

Pathaan : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

'There should be a separate censor board according to religion', Javed Akhtar spoke clearly on the 'Pathaan' controversy... | 'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

googlenewsNext

शाहरुख खान(Shahrukh Khan)चा बहुप्रतिक्षित 'पठाण' (Pathaan Movie) या चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून बराच वाद झाला होता. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. दीपिका पदुकोण(Deepika Padukone)च्या 'भगव्या बिकिनी'मुळे इतका वाद सुरू झाला की सेन्सॉर बोर्डाला हस्तक्षेप करावा लागला. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पठाण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

पठाण वादावर जावेद अख्तर यांनी आपले मत मांडले आहे. प्रत्येक धर्माचे स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असायला हवे. बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावर राज्यात बंदी घालण्याची मागणी केली होती. दीपिकाच्या भगव्या बिकिनी आणि तिच्या आउटफिटमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. यावर जावेद अख्तर म्हणाले की जर त्यांना (मंत्री नरोत्तम मिश्रा) मध्य प्रदेशसाठी वेगळे सेन्सॉर बोर्ड असावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे जाऊन चित्रपट पाहावा. जर ते केंद्राच्या चित्रपट प्रमाणपत्रावर नाराज असतील तर आम्हाल त्यांच्यात पडता कामा नये. हा त्यांचा आणि सरकारमधील विषय आहे.

जावेद अख्तर यांना नुकत्याच स्थापन झालेल्या 'रिलिजन सेन्सॉर बोर्डा'बद्दल विचारले असता ते म्हणाले की, मध्य प्रदेशात एकच सेन्सॉर बोर्ड आहे. मग केंद्रात स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड आहे. यात काय अडचण आहे? आमच्याकडे 4-5 महत्त्वाचे धर्म आहेत आणि त्यांचे स्वतःचे सेन्सॉर असले पाहिजेत. कदाचित मग मौलवी चित्रपट बघायला लागतील. ते करा. तुम्हाला माहिती आहे की नुकतीच जगत गुरु शंकराचार्यांनी धर्म सेन्सॉर बोर्डाची घोषणा केली आहे.

पठाणच्या बेशरम रंग गाण्याच्या वादावर बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, गाणे योग्य की अयोग्य हे तुम्ही आणि मी ठरवायचे आहे. यासाठी आमच्याकडे एजेन्सी आहे. लोकांनी सेन्सॉर बोर्डावर विश्वास ठेवावा. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांवरही विश्वास ठेवायला हवा. 

Web Title: 'There should be a separate censor board according to religion', Javed Akhtar spoke clearly on the 'Pathaan' controversy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.