Friendship Day 2018 : बॉलिवूडच्या 'या' गाण्यांसह मित्रांसोबत साजरा करा फ्रेन्डशिप डे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:03 IST2018-08-02T15:02:30+5:302018-08-02T15:03:36+5:30
ऑगस्टचा पहिला आठवडा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. मैत्रीचं नातं सर्व नात्यांमध्ये वेगळं मानलं जातं. या नात्याला कोणत्याही मर्यादा नसतात. जे आपण कोणाशीही बोलू शकत नाही ते आपण मित्रमैत्रीणींशी बोलू शकतो.

Friendship Day 2018 : बॉलिवूडच्या 'या' गाण्यांसह मित्रांसोबत साजरा करा फ्रेन्डशिप डे!
ऑगस्टचा पहिला आठवडा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. मैत्रीचं नातं सर्व नात्यांमध्ये वेगळं मानलं जातं. या नात्याला कोणत्याही मर्यादा नसतात. जे आपण कोणाशीही बोलू शकत नाही ते आपण मित्रमैत्रीणींशी बोलू शकतो. त्यांना आपल्या मनातलं सांगू शकतो. कधी एकटं वाटलं तर त्यांचाच आधार वाटतो. या खास नात्यासाठीच फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. बॉलिवूडमध्येही या नात्याची दखल घेत अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काही गाणीही तयार करण्यात आली आहेत. जी गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या गाण्यांनी तुम्हीही तुमचा फ्रेंडशिप डे साजरा करू शकता.
1. अतरंगी यारी, वझीर (2016)
2. सूरज डुबा है यारों, रॉय (2015)
3. यारिया, एबीसीडी (2014)
4. नंगा पूंगा दोस्त, पीके (2014)
5. टाँके झाँके, क्वीन (2013)
6. दारू देसी, कॉकटेल (2012)
7. जाने नहीं देंगे तुझे, 3 इडियट्स (2009)
8. तुही तो मेरी दोस्त है, युवराज (2008)
9. जाने क्यू, दोस्ताना (2008)
10. मझसे दोस्ती करोगे, मुझसे दोस्ती करोगे (2002)
11. दिल चाहता है, दिल चाहता है (2001)
12. यारों दोस्ती बडी ही हसीन है (1999)
13. तेरा यार हु मै - सोनू के टिटू की स्वीटी