...हे आहेत बॉलिवूडचे हॅण्डसम सरदार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 10:29 AM2017-07-18T10:29:54+5:302017-07-18T16:03:51+5:30

कुठलीही भूमिका साकारताना कलाकाराला त्या भूमिकेनुरूप स्वत:मध्ये बदल करावे लागतात. देहबोली, पेहराव, भाषा अशा सर्वच गोष्टींची उजळणी केल्यानंतरच कलाकार ...

... These are Bollywood's Handsome Commander !! | ...हे आहेत बॉलिवूडचे हॅण्डसम सरदार!!

...हे आहेत बॉलिवूडचे हॅण्डसम सरदार!!

googlenewsNext
ठलीही भूमिका साकारताना कलाकाराला त्या भूमिकेनुरूप स्वत:मध्ये बदल करावे लागतात. देहबोली, पेहराव, भाषा अशा सर्वच गोष्टींची उजळणी केल्यानंतरच कलाकार त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. पडद्यावर ‘सरदार’ची भूमिका साकारणाºया कलाकारांकडे बघून याचा अंदाज बांधणे शक्य होते की, त्या कलाकाराला ‘सरदार’ साकारताना किती मेहनत घ्यावी लागली. वास्तविक ‘सरदार’ची भूमिका ही बॉलिवूडपटांमध्ये नेहमीच प्रेक्षकांना भावणारी ठरली आहे. हॅण्डसम दिसणारे कलाकार अचानकच डॅशिंग सरदारच्या भूमिकेत झळकल्याने प्रेक्षकांना त्यांना बघणे नेहमीच औत्सुक्याचे राहिले आहे. अशाच बॉलिवूडच्या ‘हॅण्डसम सरदार’च्या भूमिकेचा आढावा घेणारा हा वृत्तांत...



शाहरूख खान 
सध्या बॉलिवूडचा किंग शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात शाहरूख ‘सरदार’ची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पगडी घातलेला शाहरूख खूपच हॅण्डसम दिसत आहे. त्याच्यासोबत चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शेट्टी असून, शाहरूख गाइडच्या भूमिकेत असेल. 



अर्जुन कपूर
आगामी ‘मुबारका’ या चित्रपटात अर्जुन कपूर डबल रोलमध्ये दिसणार आहे. एका भूमिकेत तो सरदार साकारत असून, बिल्ड बॉडीवर पगडी त्याला खूपच सूट होत आहे. या चित्रपटात त्याचा काका अनिल कपूरही सरदारच्याच भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनच्या या भूमिकेला प्रेक्षक कितपत न्याय देतील, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 



सैफ अली खान
‘लव्ह आज कल’ या चित्रपटात सैफ अली खानने ‘सरदार’ची भूमिका साकारली आहे. सैफला सरदारचा लुक खूपच शोभून दिसत होता. सिंपल, क्युड आणि हॅण्डसम सरदार प्रेक्षकांना खूपच आवडला होता. समीक्षकांनीही सैफच्या भूमिकेचे त्यावेळी कौतुक केले होते. 



रणबीर कपूर

रणबीर कपूरचा सरदार लुक बघून ‘एवढे हॅण्डसम सेल्समॅन असतात काय?’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ‘रॉकेट सिंग : सेल्समॅन आॅफ द इयर’ या चित्रपटात पगडी घातलेला रणबीर खूपच प्रभावी दिसत होता. रणबीरच्या या लुकवर प्रेक्षक फिदा झाले होते. त्याची ही भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. 



अक्षयकुमार

अक्षयकुमार याला तर सरदार लुक खूपच शोभून दिसतो. ‘सिंग इज किंग’मध्ये अक्षयने ‘सरदार’ची साकारलेली भूमिका प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. कारण त्याने सरदारचा लुक आणि पगडी एवढ्या स्टायलिश पद्धतीने पडद्यावर साकारली की, प्रेक्षक त्याच्या या स्टाइलवर अक्षरश: फिदा झाले होते. अक्षयचा हा लुक आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 



फरहान अख्तर
‘भाग मिल्खा भाग’ या बायोपिकमध्ये अभिनेता फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली. मिल्खा सिंग पंजाबी असल्याने फरहानला पडद्यावर त्यांचा लुक धारण करताना खूप मेहनत घ्यावी लागली. पगडी घातलेला फरहान खूपच सुंदर दिसत होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. 



अमिताभ बच्चन 
‘द अ‍ॅँग्री यंग मॅन’ या चित्रपटातही महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चित्रपटात सरदारची भूमिका साकारली. चित्रपटात ते एका स्ट्रिक्ट मेजरच्या भूमिकेत होते. त्यामुळे पगडीवर ते हॅण्डसम दिसत होतेच, शिवाय डॅशिंग दिसत होते. अमिताभ यांचा हा लुक खूपच पसंत केला गेला. 

Web Title: ... These are Bollywood's Handsome Commander !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.