या बॉलिवूड अभिनेत्यांचे चित्रपट मनात जागवतात देशभक्तीची भावना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 03:23 AM2018-01-26T03:23:05+5:302018-01-26T08:53:05+5:30
मनात देशभक्तीची भावना जागवणारे अनेक चित्रपट बॉलिवूडने आपल्याला दिले आहेत. बॉलिवूडचे असे काही अभिनेते आहेत. ज्यांची नावे घेतल्यानंतर मनात ...
म ात देशभक्तीची भावना जागवणारे अनेक चित्रपट बॉलिवूडने आपल्याला दिले आहेत. बॉलिवूडचे असे काही अभिनेते आहेत. ज्यांची नावे घेतल्यानंतर मनात आपोआप देशभक्तीची भावना भरून येते़ अशाच काही अभिनेत्यांबद्दल आपण जाणून घेऊ यात...
मनोज कुमार
मनोज कुमार असा अभिनेता आहे, ज्याचे नाव घेताच मनात आदर भरून येतो. देशभक्तीपर चित्रपट केल्यामुळे मनोज कुमार पुढे भारत कुमार म्हणून ओळखला जाऊ लागला. उपकार, पूरब और पश्चिम, शहीद, क्रांति अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटात मनोज कुमारने काम केले, अनेक चित्रपटांची निर्मिती व लेखनही त्याने केले.
बलराज साहनी
बलराज साहनी यांनी आपल्या चित्रपटांतून देशभक्ती जागवली. भारत-पाक फाळणीवर आधारित चित्रपट गरम हवा, धरती के लाल, दो बीघा जमीन अशा अनेक चित्रपटांसाठी बलराज साहनी ओळखले जातात.
नाना पाटेकर
नाना पाटेकर यांचीही भारत मातेचा सच्चा सुपूत्र अशीच ओळख राहिली आहे. प्रहार, क्रांतिवीर, तिरंगा, कोहराम अशा त्यांच्या अनेक चित्रपटांनी देशवासियांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. त्याचे योगदान बघता, लष्कराने त्यांना कॅप्टन श्रेणीच्या अधिकाºयाचा सन्मान दिला होता.
सनी देओल
सनी देओल याचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले चित्रपटचं गाजले नाहीत तर या चित्रपटांमधील सनीच्या तोंडचे संवादही प्रचंड लोकप्रीय झालेत. इंडियन, गदर, बॉर्डर, माँ तुझे सलाम,1931: शहीद हे त्याचे चित्रपट प्रचंड गाजलेत.
अक्षय कुमार
अक्षय कुमारनेही अनेक देशभक्तिपर चित्रपटांत काम केले आहे. याचमुळे मनोज कुमारनंतर अक्षय कुमारला आजघडीला भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याचा अलीकडचा बेबी, रूस्तम, एअरलिफ्ट, नाम शबाना अशा अनेक चित्रपटांनी लोकांच्या मनातील देशभक्तीची भावना प्रबळ केली.
अजय देवगण
अजय देवगणने आपल्या अदाकारानी अनेक महापुरूषांना पडद्यावर जिवंत केले. अपहरण, गंगाजल, मेजर साहब, द लीजेंड आॅफ भगतसिंह यासारखे चित्रपट त्याने केलेत. अजयने साकारलेली भगतसिंगची भूमिका प्रचंड वाखाणली गेली.
आमिर खान
\
आमिर खानने सरफरोश, मंगल पांडे, लगान, रंग दे बसंती अनेक चित्रपट केलेत. चंद्रशेखर आझाद आणि मंगल पांडे यांची व्यक्तिरेखा साकारणा-या आमिरने अनेक सामाजिक मुद्यांवर आधारित चित्रपटांतही अभिनय केला आहे.