‘या’ सेलिब्रिटींनी पब्लिक प्लेसमध्ये घातला ‘तमाशा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 12:05 PM2017-10-07T12:05:01+5:302017-10-07T17:55:23+5:30

फिल्मी हीरो जेव्हा पडद्यावर रागाच्याभरात गुंडांची धुलाई करतो तेव्हा प्रेक्षकांकडून त्याला टाळ्या मिळतात. परंतु जेव्हा तोच हीरो अथवा सेलिब्रिटी ...

'These' celebrities put 'Tamasha' in public place! | ‘या’ सेलिब्रिटींनी पब्लिक प्लेसमध्ये घातला ‘तमाशा’!

‘या’ सेलिब्रिटींनी पब्लिक प्लेसमध्ये घातला ‘तमाशा’!

googlenewsNext
ल्मी हीरो जेव्हा पडद्यावर रागाच्याभरात गुंडांची धुलाई करतो तेव्हा प्रेक्षकांकडून त्याला टाळ्या मिळतात. परंतु जेव्हा तोच हीरो अथवा सेलिब्रिटी वास्तविक जीवनात कोणाशी हुज्जत घालतो, तेव्हा लोकांना त्याचा तमाशा वाटतो. सध्या प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे पुत्र आदित्य नारायण अशाच एका प्रतापामुळे चर्चेत आहेत. आदित्यने विमानतळावर एका एअरलाइन्स कंपनीच्या स्टाफबरोबर हुज्जत घालताना त्यांना नको त्या धमक्या दिल्या. जेव्हा आदित्यच्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आला तेव्हा तो काही क्षणातच नायकाचा खलनायक झाला. नेटकºयांनी तर त्याच्यातील दुर्गुण सर्वदूर पसरविण्यासाठी जणूकाही मोहीमच उघडली आहे. वास्तविक अशाप्रकारे जाहीर तमाशा घालणारा आदित्य हा पहिलाच सेलिब्रिटी नसून, यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी जाहीर तमाशा घालून त्यांच्यातील स्टारगिरी दाखवून दिली आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...



सुशांतसिंग राजपूत
बॉलिवूडमधील रागीट स्वभावाच्या कलाकारांमध्ये सुशांतसिंग राजपूत याचाही समावेश आहे. कारण राग जणूकाही सुशांतच्या नाकावर आहे. ‘राब्ता’च्या प्रमोशनदरम्यान हे बघावयास मिळाले. जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा तो रागात नको ते बोलून गेला. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटप्रसंगी एका वरिष्ठ पत्रकाराने त्याला कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या शिक्षेविषयी प्रश्न विचारला. बस्स... एवढाच मुद्दा पकडून सुशांत असा काही संतापला की, उपस्थित दंग राहिले. राग शांत झाल्यावर त्याने म्हटले की, जर आम्हाला एखादा विषय माहिती नसेल तर त्याचे उत्तर न देण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. 



ऋषी कपूर

ऋषी कपूर यांचा रागीट स्वभाव कोणाला माहिती नसेल तरच नवल. कारण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ऋषी हुज्जत घालतात, त्याच्या कितीतरी पटीने रिअल लाइफमध्ये त्यांचे इतरांशी वाद होतात. काही दिवसांपूर्वीच मुलगा रणबीर अन् माहिरा खानविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी मीडिया प्रतिनिधींवर संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यानही त्यांनी असाच काहीसा प्रताप केला होता. त्यावेळी त्यांचे बंधू रणधीर कपूरही एका छायाचित्रकाराशी भिडले होते. 



रणबीर कपूर

ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर खूपच शांत स्वभावाचा असल्याचे म्हटले जाते. परंतु २०१३ मध्ये त्याने घातलेला ‘तमाशा’ बघून तोदेखील वडिलांप्रमाणेच रागीट असावा, अशी चर्चा लोकांमध्ये रंगली. बांद्रा परिसरात रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत डिनरला गेला होता. त्याला बघून काही छायाचित्रकार त्याच्या दिशेने धावले. हे बघताच रणबीरने एका छायाचित्रकाराला त्याचा कॅमेरा मागितला. त्यानंतर रणबीरने त्या छायाचिकाराला खडेबोल ऐकवत त्याचा कॅमेरा सोबत घेऊन गेला. तसेच कॅमेरा हवा असेल तर सिनियरला कॉल करायला सांग, असा त्याने उपदेशही दिला. 



सलमान खान
रागीट सेलिब्रिटींचा विषय सुरू असताना त्यात सलमान खानचा उल्लेख न करणे कोणालाही पटणार नाही. कारण रागाशी सलमानचे जणू नाते असावे. काही वर्षांपूर्वी अभिनेता अनिल कपूरच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना सलमानने एका चाहत्याच्या चक्क कानशिलात लगावली होती. सलमानच्या मते, हा चाहत्या त्याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करीत होता. वास्तविक सलमानचा हा एकमेव किस्सा नव्हे बºयाचवेळा त्याने अशाप्रकारे राग व्यक्त केला आहे. 



सैफ अली खान
नवाब सैफ अली खान हादेखील रागीट स्वभावाचा असल्याचे समजते. २०१२ मध्ये एका एनआरआय बिझनेसमॅनने सैफच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले होते की, सैफने मुंबईतील एका हॉटेलात एनआरआयला मारपीट केली होती. 



गोविंदा 
गोविंदाला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवणे आजही जमले नाही. काही वर्षांपूर्वी शूटिंगदरम्यान त्याने एका चाहत्याच्या श्रीमुखात भडकावली होती. हे प्रकरण एवढे पेटले होते की, अखेर त्याचा सोक्षमोक्ष न्यायालयात लावण्यात आला. न्यायालयाने गोविंदाला चुकीची जाणीव करून देताना त्याला जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. तसेच नुकसानभरपाई म्हणून त्या चाहत्याला पाच लाख रुपये देण्याचे ठणकावले होते. 

Web Title: 'These' celebrities put 'Tamasha' in public place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.