पद्मावतीच्या प्रदर्शनामुळे या चित्रपटांचे होऊ शकते नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 05:30 AM2018-01-05T05:30:43+5:302018-01-05T11:00:43+5:30

पद्मावती चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पद्मावती या चित्रपटाचा ...

These films can be damaged due to Padmavati's exposure | पद्मावतीच्या प्रदर्शनामुळे या चित्रपटांचे होऊ शकते नुकसान

पद्मावतीच्या प्रदर्शनामुळे या चित्रपटांचे होऊ शकते नुकसान

googlenewsNext
्मावती चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पद्मावती या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता वाटत आहे. या चित्रपटातील भुमर हे गाणे तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या सगळ्या कारणांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रेक्षक लोक आतुरतेने वाट पाहात आहे.
पद्मावती या चित्रपटाला असलेल्या प्रचंड विरोधामुळे या चित्रपटाचे नाव पद्मावत करण्याचे आणि या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्याचे सेन्सर बोर्डने सुचवले आहे. हे बदल झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशी चर्चा आहे. हा चित्रपट लवकरात लवकर म्हणजे २६ जानेवारी किंवा ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले असले तरी या तारखांना चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो अशी जोरदार चर्चा आहे. पण असे झाल्यास पॅडमॅन आणि परी या चित्रपटाच्या टीमला चांगलाच धक्का बसणार आहे.
अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या पॅडमॅन हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अक्षय सध्या जोरदार प्रमोशन करत आहे तर अनुष्का शर्माच्या लग्नानंतर तिचा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्काचा परी हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच या चित्रपटाविषयी चांगलीच हवा निर्माण झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट पॅडमॅन किंवा परी सोबत प्रदर्शित झाल्यास पॅडमॅन आणि परी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. 
सेन्सर बोर्डची संमती मिळाल्यानंतर आता संजय लीला भन्साली पद्मावतीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत काय निर्णय घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
पद्मावती या चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील रणवीरच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Also Read : ‘या’ कारणामुळे रणवीर-दीपिकाचा होणार नाही साखरपुडा?

Web Title: These films can be damaged due to Padmavati's exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.