बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 03:19 PM2020-12-08T15:19:00+5:302020-12-08T15:19:51+5:30
बऱ्याचदा प्रेक्षकांना या अभिनेत्री बोल्ड सीन कशा काय देतात, असा प्रश्न पडतो.
चित्रपटात बोल्ड सीन ही कॉमन बाब झाली आहे. हे सीन करण्यासाठी काही अभिनेत्रींना काहीच अडचण नसते. मात्र काही अभिनेत्री असे सीन करण्यासाठी घाबरतात. कित्येकदा प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो की इतक्या सर्व लोकांसमोर अभिनेत्री बोल्ड सीन कशा काय देतात. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे सीन शूट करण्यासाठी बॉडी डबलचा वापर केला जातो. म्हणजे हे बोल्ड सीन अभिनेत्री नाही तर इतर सहायक कलाकारांवर चित्रीत केले जातात. मात्र कॅमेऱ्याचा असा अँगल ठेवला जातो ज्यात प्रेक्षकांना समजत नाही की हा सीन त्याच अभिनेत्रीने केला आहे की दुसऱ्या कुणी. बॉलिवूडच्या या अभिनेत्री बोल्ड सीनसाठी बॉडी डबलचा वापर केला होता.
सनी लिओनी - एक पहेली लीला
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनीने कित्येक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की सनी लिओनीदेखील बोल्ड सीन द्यायला घाबरते. हो सनी लिओनी तिचा चित्रपट एक पहेली लीलासाठी डुप्लिकेटचा वापर केला होता. चित्रपटात सनीला मोहित अहलावतसोबत बोल्ड सीन द्यायचे होते जे सनीने डॅनियलसोबत शूट केले होते.
मल्लिका शेरावत : हिस्स
मल्लिका शेरावतचा चित्रपट हिस्स २०१० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपट त्यावेळी खूप चर्चेत आला होता. या चित्रपटात खूप बोल्ड सीन होते. मल्लिकाच्या भावाने दावा केला आहे की बॉडी डबलवर हे सीन चित्रीत केले आहेत. नंतर खुलासा झाला की चित्रपटात दाखवले गेले मातीच्या आतील सीन मल्लिकाच्या डुप्लिकेटने शूट केला होता. याशिवाय जास्त सीन मल्लिकाने स्वतः शूट केले होते.
सीमा बिस्वास ः बँडित क्वीन
फूलन देवीच्या जीवनावर बनलेल्या बँडित क्वीन चित्रपटावर लोकांनी खूप टीका केली. पण त्यानंतर या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले. चित्रपटात फूलन देवीची भूमिका सीमा बिस्वासने खूप चांगल्यारित्या साकारली आहे. चित्रपटात एक न्यूड सीनदेखील होता जो तिच्या डुप्लिकेटने शूट केला होता.
मनीषा कोईराला ः एक छोटीसी लव्हस्टोरी
अभिनेत्री मनीषा कोईरालाने २००२ साली रिलीज झालेला चित्रपट एक छोटीसी लव्हस्टोरीमध्ये काही बोल्ड सीन दिले होते. या सीन्ससाठी तिने बॉडी डबलची मदत घेतली होती.
प्रियंका चोप्रा ः सात खून माफ
२०११ साली सात खून माफ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियंका चोप्राने सात भूमिका निभावल्या होत्या. चित्रपटात एका सीनमध्ये प्रियंका टॉपलेस दाखवली होती. पण तुम्हाला समजल्यावर हैराण व्हाल की तो सीन प्रियंकाने नाही तर तिच्या डुप्लिकेटने शूट केला होता.