भारताबाहेर जन्मूनही ‘या’ अभिनेत्रींना आवडते भारतीय संस्कृती !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 09:20 AM2017-08-29T09:20:31+5:302017-08-29T14:50:31+5:30

अबोली कुलकर्णी दमदार अभिनय, उत्कृष्ट जाण आणि कलाकारासोबतच एक व्यक्ती म्हणून बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अभिनय साकारत आहेत. दमदार अभिनयाच्या ...

These Indian actresses love Indian culture even after being born out of India! | भारताबाहेर जन्मूनही ‘या’ अभिनेत्रींना आवडते भारतीय संस्कृती !

भारताबाहेर जन्मूनही ‘या’ अभिनेत्रींना आवडते भारतीय संस्कृती !

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

दमदार अभिनय, उत्कृष्ट जाण आणि कलाकारासोबतच एक व्यक्ती म्हणून बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अभिनय साकारत आहेत. दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपली ओळख निर्माण केली. कधी सौंदर्याने तर कधी त्यांच्या अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पडद्यावर कलाकारांचा अभिनय जेव्हा बोलू लागतो तेव्हा ते कोठून आलेत, त्यांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांचे राष्ट्रीयत्व कोणते या गोष्टींचं महत्त्व राहत नाही. बॉलिवूडमध्ये अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांचा जन्म भारतात नाही झाला, पण चित्रपटसृष्टीत मात्र त्या प्रसिद्ध आहेत. एवढेच नाही, तर त्यांना भारतातील संस्कृती, रूढी परंपरा, उत्सव, सोहळे प्रचंड आवडतात. पाहूयात कोणकोणत्या आहेत या अभिनेत्री...



दीपिका पादुकोण
बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली ओळख प्रस्थापित करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. तिचे वडील प्रकाश पदुकोण बॅटमिंटनपटू आहेत तर आई उज्जला ट्रॅव्हल एजंट. दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झाला. वडिलांच्या प्रशिक्षण सत्रांसाठी तिचे आईवडील डेन्मार्कला गेले होते. दीपिका एक वर्षाची झाल्यानंतर ते भारतात परतले. तिला भारताचे ट्रेडिशन बेहद आवडते. देवाची पूजा करणे, प्रार्थना करणे, रूढीपरंपरांवर आधारित संस्कृतीही तिला आवडते. दरवर्षी ती इतरांप्रमाणेच सर्व सणवार, सोहळे साजरे करते. 



कॅटरिना कैफ 
आपल्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अभिनेत्री कॅटरिना कैफला किशोरवयातच मॉडेलिंग असाइनमेंट मिळाली होती. तिचे वडील मोहम्मद कैफ काश्मिरी आहेत तर आई सुझेन ब्रिटीश. हाँगकाँगमध्ये कॅटचा जन्म झाला. तिच्या आईला समाजकार्य करण्यात रूची होती. तिच्यासोबत चीन, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, हवाई या देशांमध्ये कॅटरिना राहिली आहे. एवढ्या ठिकाणी फिरून देखील तिला केवळ भारतातील परंपरा, रूढी, संस्कृती खूप आवडते. वेगवेगळ्या सोहळयांना ती उपस्थित राहून संस्कृतीचा आनंद लुटते.



नर्गिस फाखरी
‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या  अभिनेत्री नर्गिस फाखरीचा जन्म न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झाला. ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हिरो’, ‘किक’, ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटांमध्ये ती झळकली. ती आणि उदय चोप्रा एकमेकांच्या प्रेमात असून त्यांच्याबद्दलच्या खूप चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू असते. नर्गिसला भारतीय संस्कृतीबरोबरच मराठी संस्कृतीही आवडते. तिने ‘बँन्जो’ नावाच्या मराठी सिनेमातही काम केले होते. 



जॅकलिन फर्नांडिस 
‘मर्डर २’, ‘रेस २’, ‘किक’, ‘रॉय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या जॅकलिनचा जन्म बहरेनमधील मनामा येथे झाला. तिचे वडील श्रीलंकन असून आई मलेशियन आहे. तरीही जॅकलिनला भारतीय संस्कृती प्रचंड आवडते. गणपती, दिवाळी, दसरा, होळी असे सण ती मोठ्या आनंदाने साजरे करते. या सणांवेळी विविध पदार्थ बनवायलाही तिला बेहद आवडतात.



एवलिन शर्मा
२०१२ मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन शर्माचा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली. एवलिनलाही भारतीय संस्कृती, सणवार, सोहळे, उत्सव प्रचंड आवडतात. 

एमी जॅक्सन 
अभिनेत्री एमी जॅक्सनचा जन्म ‘मान’मधील आयल येथे झाला. बॉलिवूडसोबतच तिने तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारली. ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतिकसोबत भूमिका साकारली. एमी बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना भारतीय संस्कृती मनापासून आवडते तसेच तिला संस्कृतीचा अभिमानही वाटतो.

Web Title: These Indian actresses love Indian culture even after being born out of India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.