‘या’ जाहिराती करण्यास निधी अग्रवालने दिला नकार, म्हटले ‘नो म्हणजे नो’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 04:00 PM2017-11-08T16:00:35+5:302017-11-08T21:30:35+5:30

अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री निधी अग्रवाल हीने एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, निधीने ...

The 'these' promotions did not give the funds to the forefront, saying 'no means no!' | ‘या’ जाहिराती करण्यास निधी अग्रवालने दिला नकार, म्हटले ‘नो म्हणजे नो’!

‘या’ जाहिराती करण्यास निधी अग्रवालने दिला नकार, म्हटले ‘नो म्हणजे नो’!

googlenewsNext
िनेता टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री निधी अग्रवाल हीने एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, निधीने स्पष्ट केले की, समाजाविरोधात असलेल्या एकाही जाहिरातीमध्ये मी काम करणार नाही. हा निर्णय घेताना तिने एका फेअरनेस प्रॉडक्टची जाहिरात करण्यासही स्पष्ट शब्दात नकार दिला. या जाहिरातीला नकार देताना निधीने म्हटले की, ‘फेअरनेसची जाहिरात अशी बाब आहे जे करण्यास मी कधीच होकार देणार नाही. त्याचबरोबर तिने हेदेखील स्पष्ट केले की, मी समाजातील प्रत्येक प्रकारच्या भेदभावाच्या विरोधात आहे. तिने कंपनीचे नाव आणि आॅफरविषयी सांगताना म्हटले की, अशा प्रकारच्या जाहिराती समाजात चुकीचा संदेश पोहोचवितात. यावेळी निधीने कुठल्याही कंपनीचे नाव घेतले नाही. 

अशाप्रकारच्या जाहिरातींना विरोध करणारी निधी ही पहिलीच अभिनेत्री नाही. या अगोदरही बºयाचशा अभिनेत्रींनी समाजविघातक जाहिराती करण्यास नकार दिला आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिचेही नाव आहे. तिनेदेखील फेअरनेसच्या आॅफर्स जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यास नकार दिला. त्याचबरोबर रणवीर कपूर, कल्की कोचलीन, रणदीप हुड्डा, स्वरा भास्कर या स्टार्सनीही अशाप्रकारच्या जाहिरातींना सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. आता या स्टार्सच्या यादीत निधी अग्रवालचेही नाव जुळले आहे. 

दरम्यान, निधीने टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. चित्रपटात तिने टायगरच्या प्रेयसीची भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. परंतु निधीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. विशेषत: निधीच्या डान्सला चाहत्यांनी भरभरून दाद दिली. सध्या निधी तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: The 'these' promotions did not give the funds to the forefront, saying 'no means no!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.