‘या’ स्टार्सनी घडवले 'गॉडफादर' शिवाय करिअर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 08:06 AM2017-05-19T08:06:53+5:302017-05-19T13:38:43+5:30

अबोली कुलकर्णी ‘गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणे कठीण’, असे एक गृहीतक ‘बी टाऊन’ इंडस्ट्रीत मानले जाते. मोठ्या स्टारकास्टसोबत आपल्याला ...

'These' stars have created a 'Godfather' career! | ‘या’ स्टार्सनी घडवले 'गॉडफादर' शिवाय करिअर !

‘या’ स्टार्सनी घडवले 'गॉडफादर' शिवाय करिअर !

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

‘गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणे कठीण’, असे एक गृहीतक ‘बी टाऊन’ इंडस्ट्रीत मानले जाते. मोठ्या स्टारकास्टसोबत आपल्याला ब्रेक मिळत नाही, असा उगाचच एक समज आहे. मात्र, तुम्हाला हे माहितीये का की, कुणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये करिअर करणारे स्टार्सही आज इंडस्ट्रीत आहेत. या स्टार्सनी त्यांच्या स्वत:च्या हिंमतीवर हे ग्लॅमर आणि मानसन्मान मिळवला आहे. कोण आहेत हे कलाकार पाहूयात तर मग....
 
शाहरूख खान
दिल्लीत जन्मलेल्या शाहरूख खानला लहानपणापासूनच अभिनयाची खुप आवड होती. ८०च्या दशकात जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा तो सुरूवातीला थिएटर करत होता. त्याने ‘दिवाना’ चित्रपटातून त्याच्या करिअरचा डेब्यू केला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात त्याचे नशीबच पालटले. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ नंतर त्याच्या करिअरने जी सुसाट वाट धरली ती आजपर्यंत त्याच वेगात आहे. आज त्याचे नाव ‘ए’ लिस्टच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.



प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिचे देखील नाव लिस्टमध्ये आहे. ती केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही तिच्या यशाचा झेंडा रोवत आहे. तिने एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरूवात केली होती. २००० मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’ चा किताब जिंकला. यानंतर तिने ‘दि हिरो-लव्हस्टोरी आॅफ अ स्पाय’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. आज ती एक मोठी स्टार बनली आहे. तिच्या फॅन्सची संख्या आज लाखों-करोडोंच्या संख्येत आहे. 



ऐश्वर्या रॉय 
बॉलिवूडच्या सर्वांत मोठ्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाणारी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या रॉयला पाहिले जाते. तिनेही तिचे करिअर मॉडेलिंगपासूनच सुरू केले होते. ९०च्या दशकांत ती कॉलेजच्या बाहेर  नाव कमावण्यासाठी मेहनत करू लागली. त्यानंतर तीन वर्षांत तिने तमिळ चित्रपट ‘इरूवर’ मध्ये अभिनय करून इंडस्ट्रीत आली. त्याचवर्षी तिने ‘और प्यार हो गया’ मधून डेब्यू करून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत होती. 



दीपिका पदुकोण 
दीपिका पदुकोण हिचा जन्म डेन्मार्क मध्ये झाला होता. ती बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर एक खुप प्रसिद्ध मॉडेल होती. तिने २००७ मध्ये बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून डेब्यू केला. २००८ मध्ये ‘किंगफिशर फॅशन अ‍ॅवॉर्ड’ मध्ये तिने ‘मॉडेल आॅफ द ईयर’ हा किताब मिळवला होता. आज ती ‘ए’ लिस्टर्स कलाकारांपैकी एक आहे. 



कॅटरिना कैफ 
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने तिचे करिअर मॉडेलिंगपासूनच सुरू केले होते. तिने जवळपास १४ वर्षाच्या काळात करिअर बनवायला सुरूवात केली. यादरम्यान, लंडनच्या एका कैजाद गुस्ताद यांनी एका अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी एक रोल कॅटला आॅफर केला होता. त्यानंतर तिने २००३ मध्ये ‘बूम’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर कॅटरिना कैफने खुप मेहनत केली मात्र, मागे वळून तिने पाहिले नाही. 

Web Title: 'These' stars have created a 'Godfather' career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.