...या स्टार्सनी रिअल नातं रिल लाइफमध्येही निभावलं!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 10:53 AM2017-07-20T10:53:15+5:302017-07-20T16:23:15+5:30
बॉलिवूडमध्ये बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी आपले रिअल नाते रिल लाइफ म्हणजेच पडद्यावरही निभावले. वडील-मुलगा, भाऊ-बहीण, काका-पुतण्या हे नाते ...
ब लिवूडमध्ये बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी आपले रिअल नाते रिल लाइफ म्हणजेच पडद्यावरही निभावले. वडील-मुलगा, भाऊ-बहीण, काका-पुतण्या हे नाते पडद्यावर साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. हे नातं साकारताना त्यांच्यातील केमिस्ट्री वाखण्याजोगी होती. कारण पडद्यावरील त्यांचा वावर वास्तविक जीवनातील त्यांच्यातील ट्यूनिंग दाखवून देणारा होता. त्यामुळे प्रेक्षकांकडून या जोड्यांना भरभरून प्रेमही मिळाले. अशाच रिअल नाते रिल लाइफमध्ये साकारणाºया सेलेब्सचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...!
अनिल कपूर - अर्जुन कपूर
नाते : काका - पुतण्या
चित्रपट : मुबारका (२०१७)
- आगामी ‘मुबारका’ या चित्रपटात अनिल कपूर आणि अर्जुन कपूर काका-पुतण्याची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. रिअल लाइफमध्ये काका-पुतण्या असलेले हे दोघे पडद्यावर आपले नाते कशा पद्धतीने दाखविणार हे बघणे मजेशीर ठरेल. आतापर्यंत या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर रिलीज झाला असून, त्यामध्ये दोघांची ट्यूनिंग खूपच जमून आल्याचे दिसते.
श्रद्धा कपूर-सिद्धांत कपूर
नाते : भाऊ-बहीण
चित्रपट : हसीना पारकर (२०१७)
- ‘हसीना पारकर’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर पहिल्यांदाच डॅशिंग आणि दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी श्रद्धाने कमालीची मेहनत घेतल्याचे दिसून येते. चित्रपटात सिद्धांत दाऊदची भूमिका साकारणार आहे. वास्तविक जीवनात सख्खे भाऊ-बहीण असलेले हे दोघे आता रिल लाइफमध्येही भाऊ-बहीण म्हणून बघावयास मिळतील.
धर्मेंद्र-सनी आणि बॉबी देओल
नाते : वडील-मुलगा
चित्रपट : यमला पगला दिवाना (२०११)
‘यमला पगाला दिवाना’ या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबी देओलसोबत चित्रपट करून एकच धूम उडवून दिली होती. कॉमेडीपट असलेल्या या चित्रपटात या तिघांची केमिस्ट्री खूपच रंगात आली होती. चित्रपटातही वडील-मुलांच्या भूमिकेत असलेल्या या तिघांनी बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता.
सुनील दत्त-संजय दत्त
नाते : वडील-मुलगा
चित्रपट : मुन्नाभाई एमबीबीएस (२००३)
- दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात संजूबाबाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. रिअल लाइफमध्ये नेहमीच मार्गदर्शकांची भूमिका साकारणारे सुनील दत्त रिल लाइफमध्ये आपल्या मुलाला शहाणपणाचे धडे देताना बघावयास मिळाले.
शाहिद कपूर -नीलिमा अजीम
नाते : आई-मुलगा
चित्रपट : इश्क विश्क प्यार व्यार
- अभिनेता शाहिद कपूर याने आई नीलिमा अजीम यांच्याबरोबर ‘इश्क विश्क प्यार व्यार‘ या चित्रपटात भूमिका साकारली होती. दोघांच्याही भूमिका त्यावेळी चांगल्याच गाजल्या होत्या.
अमिताभ बच्चन - अभिषेक बच्चन
नाते : वडील-मुलगा
चित्रपट : सरकार (२००५)
रिअल लाइफमध्ये अमिताभ आणि अभिषेक यांच्यातील नाते किती घनिष्ठ आहे, हे वेळोवेळी बघावयास मिळत असते. याचा साक्षात्कार राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ या चित्रपटातही बघावयास मिळाला. दोघा बाप-लेकांमधील ट्यूनिंग बघण्यासारखी होती.
सलमान खान - अरबाज खान
नाते : भाऊ-भाऊ
चित्रपट : दबंग (२०१०)
चुलबुल पांडे आणि मख्खी हे दोन नावे जरी आठवले तरी सलमान आणि अरबाजचे चेहरे समोर येतात. २०१० मध्ये आलेल्या ‘दबंग’ या चित्रपटात सलमान आणि अरबाजची भूमिका खूपच गाजली होती. पुढे दबंग-२ मध्येही या दोघा भावांमधील केमिस्ट्री बघावयास मिळाली.