मॉडेल पाउलच्या आधी या महिलांनी केले होते साजिद खानवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:17 PM2020-09-11T19:17:05+5:302020-09-11T19:18:10+5:30
साजिद खानवर एक नाही तर बऱ्याच महिलांनी मीटू मोहिमेअंतर्गत आरोप केले आहेत.
२०१८ साली देशात मीटू मोहिमेअंतर्गत बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यावर घडलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. त्याच दरम्यान दिग्दर्शक साजिद खानच्या नाव चर्चेत आले होते. साजिद खानवर एक नाही तर बऱ्याच महिलांनी मीटू मोहिमेअंतर्गत आरोप केले आहेत.
सर्वात आधी पत्रकार करिश्मा उपाध्यायने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि उंगली फेम अभिनेत्री रैचल वाइटनेदेखील साजिद खानवर आरोप केले की त्यावे कित्येक महिन्यांपर्यंत लैंगिक आणि मानसिक छळ केला आहे.
2014 मध्ये रॅचलने 'उंगली' या सिनेमांत इमरान हाशमीसोहत काम केलं होतं. रॅचलने सांगितलं की, जेव्हा मी पहिल्यांदा साजिद खानला भेटले तेव्हा त्यांनी मला कपडे काढायला लावले. तसेच 'हमशकल्स' सिनेमाकरता माझ्या एजन्सीने मला साजिद खान यांना भेटायला सांगितलं. हे बोलणं झाल्यावर अगदी 5 मिनिटांत साजीद खान यांचा फोन आला आणि त्यांनी मला इस्कॉन जुहूच्या समोरील बंगल्यात भेटायला बोलावलं. मी घरी भेटण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. तेव्हा तो म्हणाला की, काळजी करू नकोस मी माझ्या आईसोबत इथे राहतो आणि ती देखील असेल.
घरी पोहोचल्यावर त्याच्या मेडने मला हॉलमधून बेडरूममध्ये बसायला सांगितलं. तेव्हा मी सफेद टॉप आणि ब्लू जीन्स घातली होती. पण साजिद मला इतक्या घाणेरड्या नजरेने बघत होता की, मला वाटलं मी कपडेच घातले नाहीत. त्यानंतर माझ्या जवळ आला आणि ब्रेस्ट बद्दल बोलत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्याने तिला कपडे काढायला सांगितले कारण सिनेमांत हिरोइनला बिकीनी घालायची आहे. पण रॅचलने त्याला नकार दिला. असेच आरोप सलोनीले देखील लावले आहेत.
I finally decided to share my story with you. Writing this was like re-living all that horrible past I’d chosen to let go of, but I knew if I don’t today, I may never. So here’s #metoo#MetooIndiahttps://t.co/brouTYIBC7
— Saloni Chopra (@redheadchopra) October 11, 2018
त्यानंतर आता पुन्हा एकदा साजिद खानचं नाव समोर आले आहे. भारतीय मॉडेल पाउलाने साजिदवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पाउलने इंस्टाग्रामवर पोस्ट करीत लिहिले की, तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्य जगासमोर आणले आहे. पाउलने लिहिले की, मीटू मोमेंटची सुरूवात झाली तेव्हा बऱ्याच लोकांना साजिद खान विरोधात सांगितले. पण मी गप्प राहिले. कारण इंडस्ट्रीत माझा कुणीच गॉडफादर नाही आणि कुटुंबासाठी मला काम करायचे होते त्यामुळे मी गप्प बसले. आता माझे आई वडील माझ्यासोबत नाहीत आणि आता मी फक्त माझ्यासाठी काम करते आहे. अशात आता मी हिंमत करून साजिद खानबद्दल बोलू शकते की वयाच्या १७ व्या वर्षी माझे शोषण झाले.
त्यानंतर पाउलाने लिहिले की, तो माझ्यासोबत अश्लील गोष्टी बोलायचा. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मला त्याच्यासमोर कपडे काढायला सांगितले आणि म्हणाला की तुला हाउसफुलमध्ये रोल देऊ शकेल. देवाला माहित आहे की हे त्याने किती मुलींसोबत केले आहे. मी इथे कुणाच्या सांगण्यावरून आलेली नाही. मात्र त्यामुळे आली कारण माझ्यावर किती वाईट परिणाम झाला, याची जाणीव होत राहते. तेव्हा मी लहान होते आणि बोलू शकले नाही. पण आता खूप झाले आहे. त्याला तुरूंगात जावेच लागेल. फक्त कास्टिंग काउचचा आरोपमध्ये नाही तर लोकांना फूस लावण्यासाठीदेखील. आता मी थांबणार नाही. हे आणखीन चुकीचे होईल जर मी आता बोलली नाही.