उर्वशीला चोराने पाठवला ईमेल, iPhone परत करण्यासाठी ठेवली 'ही' अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:33 IST2023-10-19T17:32:27+5:302023-10-19T17:33:08+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन काही दिवसांपूर्वी हरवला. आता उर्वशीचा फोन चोरलेल्या चोराने तिला ईमेल केला आहे.

उर्वशीला चोराने पाठवला ईमेल, iPhone परत करण्यासाठी ठेवली 'ही' अट
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन काही दिवसांपूर्वी हरवला. भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याच्या वेळी उर्वशीचा आयफोन चोरीला गेला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. हरवलेला आयफोन परत मिळवण्यासाठी उर्वशीने सोशल मीडियाद्वारे मदत मागितली होती. आता उर्वशीचा फोन चोरलेल्या चोराने तिला ईमेल केला आहे.
उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन चोराने पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या ईमेलमध्ये चोराने उर्वशीला फोन परत करण्यासाठी एक अट ठेवली होती. "माझ्याकडे तुझा आयफोन आहे. जर तुला तुझा फोन परत हवा असेल, तर माझ्या कॅन्सरग्रस्त भावाला वाचवण्यासाठी मला मदत कर," असं त्या मेलमध्ये लिहिलं होतं. १६ ऑक्टोबरला हा मेल उर्वशीला चोराने पाठविला होता. यावर तिने थंब इमोजी पाठवत रिप्लायही केला होता.
दरम्यान, आयफोन हरवल्यामुळे उर्वशीला नेटकऱ्यांनी ट्रोल करत तिच्या निष्काळजीपणाची खिल्ली उडवली होती. आयफोन हरवल्याप्रकरणी उर्वशीने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.