कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:59 PM2018-11-01T19:59:25+5:302018-11-01T20:01:03+5:30

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तर फिट राहण्यासाठी वॉटर अॅरोबिक्स करते.

This thing makes Katrina Kaif fit to stay fit | कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट

कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकतरिना कैफ करते वॉटर अॅरोबिक्स

सध्या सगळ्यांनाच फिटनेसचे वेड लागले आहे. कलाकार डाएट, जिम व विविध एक्सरसाइज स्वतःला फिट ठेवताना दिसतात. आता बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तर फिट राहण्यासाठी वॉटर अॅरोबिक्स करते. वॉटर एरोबिक्‍स करताना कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


कतरिना कैफने गेल्या काही वर्षांपासून वॉटर अॅरोबिक्‍सचे प्रशिक्षण घेतले आहे आणि स्वतःला स्लीम ठेवण्यासाठी नियमितपणे ती वॉटर एक्‍सरसाइजही करत असते. सर्व वयोगटाच्या व्यक्‍ती या वॉटर एरोबिक्‍सचा आनंद घेऊ शकतात, असे तिनेच सांगितले आहे.
सध्या कतरिना सलमानबरोबर “भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्राने ऐनवेळी सिनेमा सोडल्यामुळे तिच्या रिप्लेसमेंटमध्ये काम करण्याची संधी कॅटला मिळाली. आतापर्यंत “भारत’च्या युनिटने माल्टातील शुटिंग संपवले आहे. आता आबु धाबीतील शुटिंगसाठी सगळे युनिट रवाना होणार आहे. यावर्षी कतरिनाचे आणखीन दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकी एक आहे मल्टीस्टारर “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ आणि दुसरा आहे शाहरुख खानचा “झिरो’.
 ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून यात कतरिनासह आमीर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर झिरो या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

Web Title: This thing makes Katrina Kaif fit to stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.