शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता 'डर'मध्ये साकारणार होता व्हिलनची भूमिका, या कारणामुळे नाकारला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:02 IST2025-03-10T12:01:16+5:302025-03-10T12:02:15+5:30
Shah Rukh Khan Darr Movie: 'डर' सिनेमासाठी शाहरुख खानला पहिली पसंती नव्हती.

शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता 'डर'मध्ये साकारणार होता व्हिलनची भूमिका, या कारणामुळे नाकारला सिनेमा
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या अभिनयामुळे चर्चेत येत असतो. त्याने एकापेक्षा एक दमदार सिनेमात काम केले आहे. ज्यात डर सिनेमाचाही समावेश आहे. शाहरुखने 'डर' सिनेमात (Darr Movie) वेडापीसा प्रेमीची भूमिका केली होती. त्याचं सिनेमात पात्र निगेटिव्ह होतं, पण ज्या पद्धतीनं त्याने ही भूमिका साकारली ती आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या सिनेमातील त्याचा डायलॉग ''आय लव्ह यू…क…क…क…क किरण...'' नेहमीच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. मात्र तुम्हाला माहित्येय का, की 'डर' सिनेमासाठी शाहरुख खान पहिली पसंती नव्हता. त्याच्याआधी हा चित्रपट आमिर खानला ऑफर करण्यात आला. मात्र त्याने हा सिनेमा नाकारला. त्याचे कारण समोर आले आहे.
यशराज चोप्रा यांच्या डर या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी शाहरुख खान नव्हे तर आमिर खानला निर्मात्यांची पहिली पसंती होती. आमिरलाही हा चित्रपट करायचा होता आणि त्यालाही स्क्रिप्ट आवडली होती. पण, आमिरच्या एका अटीमुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. एका मुलाखतीदरम्यान आमिरने सांगितले होते की, त्याची एक पॉलिसी आहे की जर चित्रपटात एकापेक्षा जास्त हिरो असतील तर तो दिग्दर्शकाला जॉइंट नरेशन करण्यास सांगतो. या चित्रपटासाठीही यश चोप्राने त्याला आणि शाहरुखला एकत्र नॅरेशन द्यावे अशी त्याची इच्छा होती. परंतु, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. यानंतर आमिरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका शाहरुखकडे गेली. नंतर सनी देओलला चित्रपटात शाहरुखपेक्षा कमी स्क्रीन वेळ आणि महत्त्व मिळाल्याची समस्या आली आणि या संदर्भात, दोन कलाकारांमध्ये वर्षानुवर्षे वाद झाला आणि त्यानंतर सनी देओलने यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
''शाहरुख परफेक्ट होता, मी तिथे असतो तर...''
आमिर पुढे म्हणाला की, शाहरुख खान या भूमिकेसाठी एकदम परफेक्ट होता. यशजी माझ्या माध्यमातून चित्रपटातून जे दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते जर मी केले असते तर चूकीचे झाले असते. ते न केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. १९९३ साली प्रदर्शित झालेला डर हा एक सायको थ्रिलर चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख खान, सनी देओलसोबत जुही चावला, अनुपम खेर देखील होते.