अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडिया बनली होती अभिनेत्री, भारत सोडून अमेरिकेत झालीय स्थायिक, तुम्ही ओळखलंत का हिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 07:00 AM2023-04-01T07:00:00+5:302023-04-01T07:00:07+5:30
सलवार सूटमध्ये नृत्य करताना दिसणारी ही मुलगी 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सलवार सूटमध्ये नृत्याचा सराव करणारी ही मुलगी 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक आणि ओडिसीमध्ये ट्रेंड डान्सर असलेल्या या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब पटकावला. उत्कृष्ट चित्रपट आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली मात्र लग्नानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूड आणि भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
फोटोत दिसणारी ही मुलगी 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आहे. 16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबादमध्ये जन्मलेल्या मीनाक्षीचे खरे नाव शशिकल शेषाद्री आहे. मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर मीनाक्षीने पेंटर बाबू या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, तिला खरी ओळख जॅकी श्रॉफसोबतच्या हिरो या चित्रपटातून मिळाली.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मीनाक्षीने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली. अमिताभ बच्चन ते सनी देओल, अनिल कपूर, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे.
मीनाक्षीला 'मेरी जंग', 'शहेनशाह', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळे लक्षात ठेवले जाते.
मीनाक्षी शेषाद्रीने हरीश म्हैसूर नावाच्या बँकरशी लग्न केले. लग्नानंतर मीनाक्षी भारत सोडून अमेरिकेत शिफ्ट झाली. शेषाद्री आणि हरीश यांना दोन मुले आहेत. मीनाक्षी आता नृत्य अकादमी चालवते आणि मुलांना ही कला शिकवते.