फोटोतील या अभिनेत्रीचं 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीमुळे करिअर झालं होतं उद्धवस्त, जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 01:04 PM2022-09-10T13:04:21+5:302022-09-10T13:04:48+5:30
Divya Rana: बॉलिवूडमध्ये ८०-९०च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमध्ये अनेक नायिकांची कारकीर्द बराच काळ चालली, तर काहींची लवकर संपली. अशीच एक अभिनेत्री होती ८०च्या दशकातील दिव्या राणा.
बॉलिवूडमध्ये ८०-९०च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमध्ये अनेक नायिकांची कारकीर्द बराच काळ चालली, तर काहींची लवकर संपली. अशीच एक अभिनेत्री होती ८०च्या दशकातील दिव्या राणा (Divya Rana). दिव्या आणि राम तेरी गंगा मैली (Ram Teri Ganga Maili) फेम अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) जवळपास एकाच वेळी इंडस्ट्रीत आल्या. या दोन्ही नायिका 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. पण मंदाकिनीच्या निरागसतेची आणि शैलीची चाहत्यांवर अशी जादू होती की या चित्रपटात राजीव कपूर (Rajiv Kapoor) आणि दिव्याच्या उत्कृष्ट अभिनयानंतरही त्यांची दखल घेतली गेली नाही. चित्रपटाच्या यशाचे श्रेय मंदाकिनीला दिले गेले.
राम तेरी गंगा मैली या चित्रपटात अभिनेता राजीव कपूर मुख्य भूमिकेत होता आणि दिव्यासोबतचा हा त्याचा दुसरा चित्रपट होता. दिव्याचा पहिला चित्रपट 'एक जान है हम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यानंतर राजीवचे वडील राज कपूर यांनी दोघांना घेऊन 'राम तेरी गंगा मैली' बनवला.
'राम तेरी गंगा मैली'च्या हिटचा फायदाही दिव्याला मिळाला नाही. नंतर ती 'वतन के रखवाले', 'एक ही मोक्ष', 'आसमान' आणि 'माँ कसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
तिला चित्रपटात फारसे यश मिळाले नाही, त्यानंतर दिव्या राणाने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला.
दिव्या राणाला दोन मुले आहेत. तिने आपले नाव बदलून सलमा माणेकिया असे ठेवले आहे. त्याच नावाने इंस्टाग्रामवर तिचे प्रोफाइल आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या मुंबईतच फोटोग्राफर म्हणून काम करते आहे. ती एक शिल्पकार आहे आणि मातीची शिल्पे बनवते. सोबतच ती इन्स्टावर कपड्यांचा ब्रँड प्रमोट करते.