अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:31 AM2022-07-20T11:31:23+5:302022-07-20T11:32:04+5:30

Pushpa : 'पुष्पा' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी बॉलिवूडच्या अभिनेत्याच्या एन्ट्रीसोबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

This Bollywood actor's character in 'Pushpa 2' with Allu Arjun, another big update about the film has come out. | अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर

अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर

googlenewsNext

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा २०२१ मध्ये रिलीज झालेला 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल भेटीला येणार आहे. या सीक्वलची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता दुसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ताज्या रिपोर्टनुसार, फहाद फाजिलनंतर आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee).

पुष्पा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांना दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मात्र पुष्पा द रुलचे कथानक अद्याप गुलदस्त्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसारर, बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयीदेखील या चित्रपटात दिसणार असल्याचे समजते आहे. त्याला एका खास भूमिकेसाठी साइन केल्याचे समजते आहे. तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकतो. अल्लू अर्जुनसोबत मनोज वाजपेयीला स्क्रीन शेअर करताना पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.


मनोज वाजपेयी सोबत चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. फहाद फाजिलच्या नावावरदेखील निर्मात्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. फक्त पुष्पा द रुलसाठीच नाही तर पुष्पा ३साठीही त्याची निवड केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, फहाद म्हणाला की, जेव्हा सुक्कू सरांनी मला पहिल्यांदा स्टोरी ऐकवली होती तेव्हा पुष्पा हा एकच सिनेमा होता. पोलीस स्टेशन सीन आणि माझे काम मध्यांतरानंतर होते. मात्र आता याचा दुसरा भाग येतो आहे. नुकतेच त्यांनी माझ्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितले की, पुष्पा ३चीदेखील तयारी ठेवा कारण माझ्याकडे खूप मटेरियल आहे.

Web Title: This Bollywood actor's character in 'Pushpa 2' with Allu Arjun, another big update about the film has come out.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.