बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने महागड्या कारसोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, तुम्ही ओळखलंत का तिला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:31 PM2022-01-31T18:31:37+5:302022-01-31T18:33:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री महागड्या कारमधून फिरताना तुम्ही अनेकदा पाहाल. पण कधी कधी या अभिनेत्री रिक्षा राईडचा आनंद लुटताना दिसतात.

This Bollywood actress traveled from expensive cars to rickshaws, did you know her? | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने महागड्या कारसोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, तुम्ही ओळखलंत का तिला ?

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने महागड्या कारसोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, तुम्ही ओळखलंत का तिला ?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री महागड्या कारमधून फिरताना तुम्ही अनेकदा पाहाल. पण कधी कधी या अभिनेत्री रिक्षा राईडचा आनंद लुटताना दिसतात. श्रद्धा कपूर  (Shraddha Kapoor) देखील असेच काहीसे करताना दिसली. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना सामान्य माणसांसारखे जगणं आवडतं. यातील एक अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)आहे. आपल्या साधेपणाने ती नेहमीच चाहत्यांटी मनं जिंकतं असते. आता पुन्हा एकदा श्रद्धा काहीतरी करताना दिसली, हे पाहून चाहते अभिेनत्रीवर कौतुकाचा वर्षाव करतायेत. श्रद्धाचा एक व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे.

श्रद्धाने रिक्षाने केला प्रवास 
शक्ती कपूरची लाडकी लेक श्रद्धाने नुकतेच रिक्षाने प्रवास केला. हा अनुभव सांगताना तिने स्वतःचा एक व्हिडिओही चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती रिक्षात बसलेली दिसते आहे. इथे तिच्या चेहऱ्यावर मास्क आहे, त्यामुळे कदाचित रिक्षावालाही तिला ओळखू शकला नाही. व्हिडिओमध्ये श्रद्धा काळ्या रंगाचा टॉप परिधान करून चष्मा लावलेली दिसत आहे. 

 श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती लव रंजनच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यानंतर आता 'चालबाज इन लंडन' या शीर्षकाने बनवलेल्या चित्रपटाचीही दिसणार आहे.

Web Title: This Bollywood actress traveled from expensive cars to rickshaws, did you know her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.