करण जोहरच्या 'कॉफी विद करण ८'मध्ये बॉलिवूडचे हे जोडपे असणार पहिले पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 02:47 PM2023-10-20T14:47:59+5:302023-10-20T14:48:47+5:30

Koffee With Karan 8: करण जोहर पुन्हा एकदा त्याच्या सर्वात वादग्रस्त टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या सीझन ८ सह पुनरागमन करत आहे. चाहते शोच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

This Bollywood couple will be the first guests on Karan Johar's 'Koffee With Karan 8' | करण जोहरच्या 'कॉफी विद करण ८'मध्ये बॉलिवूडचे हे जोडपे असणार पहिले पाहुणे

करण जोहरच्या 'कॉफी विद करण ८'मध्ये बॉलिवूडचे हे जोडपे असणार पहिले पाहुणे

करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा त्याच्या सर्वात वादग्रस्त टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या सीझन ८ (Koffee With Karan 8)सह पुनरागमन करत आहे. चाहते शोच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्याच्या दरम्यान, करण जोहरने अलीकडेच 'कॉफी विथ करण ८' च्या सेटवरील एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने शोच्या सेटवरील आयकॉनिक सोफा आणि लिजेंडरी मग देखील दाखवला आहे.

या सगळ्यात 'कॉफी विथ करण'च्या पाहुण्यांची यादी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. यासोबतच अनेक सेलेब्सचीही नावे समोर येऊ लागली आहेत जे या शोमध्ये सहभागी होणार आहेत. आता या शोमध्ये बी-टाऊनचे सर्वात पॉवरफुल कपलही दिसणार असल्याची चर्चा आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही जोडी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी 'कॉफी विथ करण'च्या सीझन ८ मध्ये, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग करण जोहरच्या अवघड प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, करण दीपिका आणि रणवीरसोबत त्याच्या मोस्ट अवेटेड शोचा सीझन ८ची सुरूवात करणार आहेत. करण जोहरनेही दीपिका आणि रणवीर सिंगसोबत एपिसोड शूट केला असून पुढील आठवड्यात २६ ऑक्टोबर रोजी होणार्‍या प्रीमियरची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. दीपिका आणि रणवीर शोमध्ये करण जोहरसोबतच्या त्यांच्या नात्यासह अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलले होते.

हे आहेत 'कॉफी विथ करण ८'चे अपेक्षित पाहुणे
शोच्या अपेक्षित पाहुण्यांपैकी कार्तिक आर्यन, रोहित शेट्टी आणि अजय देवगण, सारा अली खान आणि अनन्या पांडे, आलिया भट आणि करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. तथापि, शोच्या पुष्टी झालेल्या पाहुण्यांची यादी अद्याप समोर आलेली नाही.
कॉफी विथ करण सीझन ८ ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम केला जाईल. हा शो २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसारित होईल.

Web Title: This Bollywood couple will be the first guests on Karan Johar's 'Koffee With Karan 8'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.