बॉलिवूडचा हा गायक 'चाबुक'मधून मराठी सिनेमात करतोय पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 05:05 PM2022-02-19T17:05:55+5:302022-02-19T17:09:32+5:30
चाबुक'मध्ये समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
काही कलाकारांच्या जोडया या चित्रपटाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकांनाही त्यांना एकत्र पहाण्यात मजा येते. तर काही नवीन जमलेल्या जोडया आपल्या एकत्र येण्यातून उत्सुकता निर्माण करत असतात. अशीच एक जोडी आगामी ‘चाबुक’ चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. ही जोडी आहे अभिनेता मिलिंद शिंदे आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांची. बॉलीवूडपटांच्या सिनेमॅटोग्राफी आणि सहाय्यक दिग्दर्शनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या कल्पेश भांडारकर यांनी प्रथमच स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. श्रीसृष्टी मोशन पिक्चर कंपनीची प्रस्तुती असलेल्या चाबुक चित्रपटाची निर्मीती सुद्धा कल्पेश भांडारकर यांनी केली आहे. ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे बंधू असलेल्या कल्पेश यांच्या 'चाबुक'मध्ये समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
यासिनेमातून बॉलिवूडचा गायक विपिन पटवा मराठीत पदार्पण करतोय. गायक, संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार विपिन पटवा आता काही मराठी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. भुज: द प्राईड ऑफ इंडिया, दे दे प्यार दे, यासिनेमांसाठी आवाज दिला आहे. 2002 मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून सुरुवात केल्यामुळे विपिनचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.