Childhood Photo: फोटोतील या क्युट चिमुकलीनं आमिर पासून सलमानपर्यंत केलंय काम, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:28 IST2022-11-21T17:16:35+5:302022-11-21T17:28:12+5:30
बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत..

Childhood Photo: फोटोतील या क्युट चिमुकलीनं आमिर पासून सलमानपर्यंत केलंय काम, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री
Bollywood Stars Childhood Photos:गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत..
बॉलिवूड सेलिब्रिटीं(Bollywood Celebs) च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचे आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो दाखवणार आहोत, जिने सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक दिग्गज स्टार्ससोबत काम केले आहे. तिचे फॅन फॉलोइंग केवळ देशातच नाही तर परदेशातही आहेत.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून असीन आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असीनचा बालपणीचा फोटो आहे. असीन दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून गजनीच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
वयाच्या १५ व्या वर्षापासून असीन दाक्षिणात्य कलाविश्वात कार्यरत आहे. असीनने गजनीसह रेडी, खिलाडी 786, हाऊसफुल्ल 2, बोल बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.सध्या असीन कलाविश्वापासून दूर आहे. असीनने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचे को फाऊंडर राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. अक्षय कुमारमुळे असीन आणि राहुल शर्मा यांची भेट झाली. या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं.असीनला एक लहान मुलगी असून ती तिचा वेळ जास्तीत जास्त आपल्या लेकीसोबत घालवत असते.