फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला सलमान खानने केलं लाँच, पण कतरीनासोबतच्या तुलनेन बर्बाद झालं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 08:00 AM2023-05-13T08:00:00+5:302023-05-13T09:34:41+5:30
हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. सतत कतरिनासोबत होत असलेली तुलना तिला नकोशी झाली.
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने अनेक हिरोईनला संधी दिली. त्यापैकीच एक ही अभिनेत्री आहे. फोटोत दिसणाऱ्या या मुलीने सलमान खानच्या वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. सलमान अनेक समारंभात, पार्टीत जरीनसोबत उपस्थिती लावत असे. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.
हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. पण आता हेच कतरीनासारखे रूप तिच्या मागार्तील अडथळा ठरला आहे. सतत कतरिनासोबत होत असलेली तुलना तिला नकोशी झाली.
एवढ्या हिंट दिल्यानंतर तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं असेलच. नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो तुम्ही ही अभिनेत्री कोण आहे ती. फोटोत दिसणारी ही चिमुकली जरीन झान आहे. जरीन आज आपला वाढदिवस साजरा करते आहे.
जरीनने वीर या चित्रपटानंतर हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ या चित्रपटांमध्ये काम केले. पण जरीनला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
‘वीर’ चित्रपट फ्लॉप झाल्यानतंरही सलमान हा नेहमी जरीनला मदत करतो, अशी चर्चा कायमच सिनेसृष्टीत रंगत असते. या चर्चांमुळे जरीन संतापली आहे. जरीनने हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती सलमान व तिच्या नात्यावर बोलली होती. सलमान अजूनही माझी मदत करतो, असा अनेक लोकांचा समज आहे. मी सलमानचे आभार मानते. कारण तो नसता तर मी कधीच इंडस्ट्रीत आले नसते. त्याने मला इंडस्ट्रीत संधी दिली. पण इथूनच खºया अर्थाने माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी मला काहीही माहिती नव्हते, असं ती म्हणाली होती.
सलमान खान हा एक शानदार व्यक्ती आहे. पण तो फार व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी सलमान आणि त्याच्या भावांच्या पाठीवरचं माकड होऊ शकत नाही. मी जे काही काम करते ते सलमान खानच्या माध्यमातून मला मिळतं, असं लोकांना वाटतं. पण यात काहीही सत्य नाही, असं ती स्पष्टपणे म्हणाली. सलमान हा मित्र आहे. तो माझ्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. पण म्हणून मी त्याला त्रास देत नाही. माझे वडील आम्हाला लहान असताना सोडून गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतली. मला मदत किंवा मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. मी फार घाबरली होती, असं तिने सांगितलं.