रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 19:08 IST2023-06-30T19:06:31+5:302023-06-30T19:08:56+5:30
आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला
चेन्नई - दाक्षिणात्य स्टार अभिनेता रामचरण (Ramcharan) आणि पत्नी उपासना (Upasana) नुकतेच आईबाबा झाले आहेत. २० जून रोजी उपासनाने मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या रामचरणचे कुटुंब आनंदात आहेत. उपासना आणि त्यांच्या गोंडस बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. 'मेगा प्रिन्सेस'चे रामचरणच्या घरी जल्लोषात स्वागतही झाले. आजोबा मेगा स्टार चिरंजीवी यांनीही नातीला पाहून आनंद व्यक्त केला. सध्या रामचरणच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यातच, आज रामचरण व उपासनाच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला.
आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता, नातीला झोपाळ्यात झोका देत असताना जवळच उभे असलेल्या चिरंजीवी यांचा फोटो व्हायरल झाला आहे. 'पुष्पा' फेम अल्लु अर्जुननेही दोघांचं अभिनंदन केलं. तो आपल्या भाचीला भेटण्यासाठी रुग्णालयातही पोहोचला होता. बाळाच्या जन्मानंतर तीन दिवसांनी उपासनाला रुग्णालयातून सोडण्यात आले. लोकांनी त्यांचं फुलांनी स्वागत केलं. अद्यापही चिरंजीवी कुटुंबाचं अभिनंदन करण्यात येत असून शगुन म्हणून भेटवस्तूही देण्यात येत आहेत. त्यातच, आज नामकरण सोहळा आनंद आणि उत्साहात पार पडला.
रामचरण आणि उपासना यांच्या कन्येचं नाव ''क्लिन कारा कोनिडिला'' असे ठेवण्यात आले आहे. ललिथा सहस्त्रनाममधून ते घेतले आहे. त्याचा अर्थ, 'पूर्ण बदल' असा होतो. एकदम हटके नावामुळे सर्वांनाच या नावाचं कोडं पडलं असून नेटीझन्स नामकरणानंतर या नावाचा अर्थ शोधण्यात दंग झाले आहेत. रामचरणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या नावाची माहिती दिली. त्यानंतर, चाहत्यांनी कमेंट करुन कुटुंबीयांस शुभेच्छा दिल्या. तर क्लिन कारा कोनिडिला हिलाही आशीर्वाद आणि गोड गोड पापा दिला आहे. दरम्यान, या हटके नावामुळे रामचरण आणि उपासना चर्चेत आले आहेत. या नामकरण सोहळ्याला रामचरण आणि उपासना दोघांच्या कुटूंबातील सदस्य व जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
अंबानींकडून सोन्याचा पाळणा
दरम्यान, नीता आणि मुकेश अंबानींनी रामचरण व उपासना यांच्या कन्येसाठी अत्यंत महागडं गिफ्ट दिलं आहे. अंबानी दाम्पत्याने शुभेच्छांसह हे महागडं गिफ्ट दिलं असून सोन्याचा पाळणा असल्याचं समजतय. पिंक विलाने यासंदर्भात वृत्त दिलं असून याबाबत अद्याप अधिकृतपणे कुठेही माहिती देण्यात आली नाही.