आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 05:55 PM2024-12-09T17:55:22+5:302024-12-09T17:55:46+5:30

Alia Bhatt : पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया भटला किस करण्यासाठी नकार दिल्यामागचे कारण वाचून व्हाल हैराण

This Pakistani actor refused to kiss Alia Bhatt | आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार

आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) हा एक प्रतिभावान कलाकार आहे, तो पाकिस्तानच्या अनेक शो आणि चित्रपटांमध्ये दिसला आहे, इतकेच नाही तर त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटांमध्ये काम करताना त्याने आलिया भट (Alia Bhatt) आणि सोनम कपूर (Sonam Kapoor) यासारख्या अभिनेत्रींना ऑन स्क्रीन किस करण्यासाठी नकार दिला होता. 

फवाद खान आणि आलिया भट कपूर अँड सन्स आणि ए दिल है मुश्किल या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पाकिस्तानी कलाकाराच्या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये फवादला आलिया भटला किस करायचे होते पण त्याने तसे केले नाही, उलट तो सीन करताना तो असा ॲक्टिंग करत होता की जणू तो किस करतोय असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नव्हते. याबद्दल फवाद खान आणि आलिया भट या दोघांनीही सांगितले होते.

फवाद खान म्हणाला...
फवाद खानने मुलाखतीत सांगितले होते की, तो सिनेमात नो किसिंग पॉलिसी फॉलो करतो. त्यामुळे तो कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन देणार नाही आणि ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना खूप चांगली वाटते. मुलाखतीदरम्यान फवाद खान म्हणाला की, जर त्याने चित्रपटात काम करताना ही पॉलिसी मोडली तर त्याचे चाहते नाराज होतील, त्यामुळे त्याला चाहत्यांचा अनादर करायचा नाही.

आलिया म्हणाली...
एकदा,आलिया भटने एका मुलाखतीत फवाद खानसोबतच्या किसिंग सीनचा अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले होते की, फवादसोबत चित्रपटात एक किसिंग सीन होता, जेव्हा आम्ही सीन केला होता तेव्हा ठरवले होते की आम्ही चीट किस करू, त्यानंतरही मी जेव्हाही फवादच्या चेहऱ्याजवळ जायचे तेव्हा तो थोडा मागे जायचा. मी त्याची पॉलिसी बिघडवणार नाही हे मला त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगावे लागत होते. आलियाने असेही सांगितले होते की फवाद खान चित्रपटात नो किसिंग पॉलिसी फॉलो करतो.

Web Title: This Pakistani actor refused to kiss Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.