फिटनेसच्या बाबतीत शिल्पाच नाही तर मलायकाही टक्कर देते ‘ही’ टॉलिवूडची अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:53 PM2022-07-20T17:53:14+5:302022-07-20T18:00:49+5:30
सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडियो शेअर करत असते.
फिट राहणे ही काळाची गरज बनली आहे. आजकाल सगळेच आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देत आहेत. साधारण लोकं सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल करत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. हेल्दी डाएट, योग्य व्यायाम करत स्वतःचा फिट ठेवताना दिसतात.तसे तर सुरुवातीपासूनच फळे खाण्यावर अनेकजण भर देत होते. मात्र, आता त्याचे प्रमाण चांगले वाढल्याचे बघायला मिळते. सर्वसाधारण लोकं देखील आपल्या फिटनेसच्या बाबतीत चांगलेच जागरुक झाले आहेत. म्हणून आता मनोरंजन सृष्टीमध्ये असणारे अनेक सेलिब्रिटीज देखील आपल्या फिटनेसकडे अजून जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.
मलायका अरोराने सर्वानाच फिटनेस गोल्स दिले आहेत. वयाच्या ४८व्या वर्षी देखील मलायका अतिशय सुंदर आणि तरुणसुद्धा दिसते. फिटनेसच्या बाबतीत मालयकाच्या तोडीस तोड म्हणून नेहमीच ४६ वर्षांच्या शिल्पा शेट्टीच नाव घेतलं जात. शिल्पा शेट्टी सुरुवातीपासूनच खूप फिट आहे. मधल्या काळात काही अभिनेत्रींचे वेगवेगळ्या कारणांमुळे वजन वाढले होते.साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक फिट आणि सुंदर अभिनेत्री आहेत. तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथा, सारख्या अभिनेत्री चांगल्याच फिट आहेत. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या या अभिनेत्रींना देखील, एका नव्या अभिनेत्रीने फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे. अभिनेत्री सिरत कपूरने सध्या सगळ्यांनाच चांगलाच फिटनेस गोल दिला आहे.
बॉलीवूड मधील ‘जिद’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. आणि त्यानंतर मात्र तिने आपला मोर्चा साऊथच्या सिनेमांकडे वळवला. टायगर, ओक्का क्षणाम, राजू गरी गढी सारख्या सिनेमामध्ये तिने काम केले आहे. सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडियो शेअर करत असते.
तिचे अनेक विडीओ फिटनेसच्या, म्हणजेच व्यायामाच्या बाबतीत असतात. आपले जिम मधले अनेक फोटोजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.सध्या साऊथची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री सिरतला ओळखले जाते.परफेक्ट टोन्ड बॉडी कमावली आहे म्हणून सिरत कमालीची आकर्षक दिसते.
अनेकांना सिरत इतकी जास्त फिट कशी काय आहे असा प्रश्न पडला आहे. तर तिने स्वतः आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. केवळ वर्कआऊटच नाही तर सिरत फिट राहण्यासाठी योग्य डाएट देखील फॉलो करते. योग्य प्रमाणात पाणी पिते आणि फळ खाते. ती रोज ८ तासांची झोप घेते.अशा दिनचर्येमुळे ती इतकी जास्त फिट आणि सुंदर आहे, असं सिरतच मत आहे.