जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:19 PM2020-02-14T12:19:41+5:302020-02-14T12:19:52+5:30
‘माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तेथेच मी वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले..
पुणे : ‘माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तेथेच मी वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले. माझी बायको जर्मनीची आहे; मात्र मी भारत निवडला. कारण माझे हृदय नेहमीच भारत आणि भारतीयांसाठीच धडधडत राहिले आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित ‘चौथ्या पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट २०२०’च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध अमेरिकी व्यावसायिक आणि बँकिंग गुंतवणूकदार सोनाली वर्मा, फायझरचे माजी संचालक डॉ. मॅक जावडेकर, रॉबर्ट नेईस्मिथ, एमआयटी संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, संगीत कला अकादमीच्या संचालिका प्रा. ज्योती ढाकणे-कराड, प्रा. आदिनाथ मंगेशकर, पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर रवांदे, डॉ. अनंत चक्रदेव आदी उपस्थित होते. दरम्यान, सोनाली वर्मा, मॅक जावडेकर व राबर्ट नेईस्मिथ यांनीही विचार व्यक्त केले.
पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर रवांदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनंत चक्रदेव यांनी आभार मानले.